आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण : अकोले तालुक्यात शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये झाली युती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - राज्यात शिवसेनेने ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली असली, तरी अकोले तालुका त्यासाठी अपवाद ठरला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व गट आणि गणातून राजकीयदृष्ट्या ताकदवान असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करण्याची गरज लक्षात घेऊन शिवसेना भाजपमध्ये युती करण्यात आली. 
राष्ट्रवादीच्या विरोधात आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना भाजपने एकत्रित ताकद निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. 

तालुक्यात शिवसेनेने आपल्या पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत भाजपसोबत समझोता एक्स्प्रेस घडवून आणली. राष्ट्रवादीने दुपारी दोन वाजता आपल्या सर्व अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे एबी फार्म दाखल केले. मात्र, दुपारी २.४० वाजेपर्यंत युतीच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली नव्हती. युतीचे काही कार्यकर्ते उमेदवारांना अंधारात ठेवून अगदीच शेवटच्या क्षणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य जिल्हा परिषदेचे देवठाण गटातील उमेदवार जालिंदर वाकचौरे यांनी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा केले. यामुळे युतीत समशेरपूर देवठाण गटात मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे. याचा परिणाम म्हणून युतीच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणीसाठी समशेरपूर देवठाण गटातून गणोरे गणातून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेना भाजप यांनी जिल्हा परिषदेच्या एकूण सहा गटांतील प्रत्येकी तीन गटांतील पंचायत समितीच्या एकूण बारापैकी शिवसेनेला आठ भाजपला चार जागा वाटपाचा समझोता मान्य केला. यामुळे समशेरपूर गटातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी आपली पत्नी सुषमा यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना जय महाराष्ट्र केला.
 
■राष्ट्रवादीकाँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार :
●समशेरपूर गट संगीता बेणके (राष्ट्रवादी), सुषमा दराडे (शिवसेना), समशेरपूर गण कमल साबळे (राष्ट्रवादी), रंजना मेंगाळ (शिवसेना ), खिरविरे गण निवृत्ती भांगरे (समशेरपूर), देवराम सागिरे (शिवसेना)
●देवठाण गट सावळेराम शेळके (राष्ट्रवादी), जालिंदर वाकचौरे (भाजप), देवठाण गण माधवी जगधने (राष्ट्रवादी), सुरेखा उदमले (शिवसेना), गणोरे गण विठ्ठल उगले (राष्ट्रवादी), नामदेव आंबरे (शिवसेना)
●धामणगाव आवारी गट कैलास वाकचौरे (राष्ट्रवादी), अनिता मोरे (शिवसेना), धामणगाव गण लक्ष्मण मेंगाळ (राष्ट्रवादी), मारुती मेंगाळ (शिवसेना), धुमाळवाडी गण गोरख पथवे (राष्ट्रवादी), प्रमोद दराडे (शिवसेना)
●राजूर गट पुष्पा निगळे (राष्ट्रवादी), सुनीता भांगरे (भाजप), राजूर गण शशिकांत देशमुख (राष्ट्रवादी), दत्तात्रय देशमुख (भाजप), वारंघुशी गण संगीता सदगीर (राष्ट्रवादी), अलका आवसरकर (भाजप)
●सातेवाडी गट चिंधू भांगरे (राष्ट्रवादी), डाॅ. किरण लहामटे (भाजप), सातेवाडी गण किसन शिरसाठ (राष्ट्रवादी), दत्तात्रय बोराडे (भाजप), मवेशी गण विमल राऊत (राष्ट्रवादी), ऊर्मिला राऊत (भाजप)
●कोतूळ गट रमेश देशमुख (राष्ट्रवादी), सुहास जाधव (शिवसेना), कोतूळ गण सारिका कडाळे (राष्ट्रवादी), सीमा मेंगाळ (शिवसेना), 

ब्राह्मणवाडा गण : सीताबाई गोंदके (राष्ट्रवादी), ठकुबाई निगळे (शिवसेना), ●बोटा गट ( ता. संगमनेर) बबनराव गागरे, बोटा गण संतोष शेळके (बोटा), आंबी खालसा गण नंदा घुले (सावरगाव घुले) यांचा समावेश आहे. 

गटासाठी ९२, गणांसाठी ९४ अर्ज 
अकोलेतालुक्यात जिल्हा परिषद गटातील जागांसाठी ९२ उमेदवार पंचायत समितीच्या गणातील १२ जागांसाठी ९४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. समशेरपूर गट १५, समशेरपूर गण ८, खिरविरे गण १४, देवठाण गट १२, देवठाण गण ७, गणोरे १५, धामणगाव आवारी गट २५, धामणगाव आवारी गण ४, धुमाळवाडी गण ४,राजूर गट ६,राजूर गण ८, वारंघुशी गण ४, सातेवाडी गट ९, सातेवाडी गण११, मवेशी ४, कोतूळ गट २५, कोतूळ गण ६, ब्राह्मणवाडा गण ९. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...