आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत संपल्यानंतरही अॅनालॉग सिग्नल सुरुच, शहरी क्षेत्राची डेडलाईन 31 डिसेंबरला अाली संपुष्टात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मावळत्यावर्षातील शेवटच्या दिवसापर्यंत (३१ डिसेंबर) सेट टॉप बॉक्स बसविल्यास अॅनालॉग सिग्नल बंद करुन टिव्हीचे प्रक्षेपण थांबविले जाईल, ही घोषणा शासनाने अप्रत्यक्षपणे मागे घेतली आहे. या प्रकारामुळे नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला असून शहरी क्षेत्रासाठी अद्याप तरी नवी डेडलाईन देण्यात आली नाही. 
 
करमणूक कराची चोरी थांबवून संबंधित विभागाचे काम अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने शासनाने टिव्ही धारकांसाठी सेट टॉप बॉक्सची सक्ती केली आहे. या धोरणानुसार शहरी क्षेत्रातील नागरिकांना प्रारंभी ३० नोव्हेंबर आणि त्यानंतर २० ३१ डिसेंबर अशी मुदतवाढ देण्यात आली होती.
 
या कालावधीत यंत्रे बसविल्यास अॅनालॉग सिग्नल बंद करुन संबंधितांच्या टिव्हीचे प्रक्षेपण थांबविण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात तो दिव्स उजाडल्यावर ही तसे झाले नाही. त्यामुळे शासनानेच या बाबीला अप्रत्यक्ष मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट आहे.
 
ग्रामीणक्षेत्राला ३१ मार्चपर्यंत मुभा : सेटटॉप बॉक्सच्या बाबतीत प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण अशी दोन प्रकारे विभागणी केली आहे. यातील शहरी क्षेत्रासाठीची मुदतवाढ ३१ डिसेंबर रोजीच संपुष्टात आली आहे. परंतु ग्रामीण भागासाठी ३१ मार्च २०१७ ही नवी तारीख ठरविण्यात आली असल्याने तेथील रहिवाश्यांना तीन महिन्यासाठी अभय मिळाले आहे. 
 
तारीख कळली नाही 
- सेट टॉपबॉक्स बसविण्यासाठी ग्रामीण भागा करिता ३१ मार्च ही तारीख दिली आहे. परंतु शहरी भागासाठी अद्याप नवी तारीख देण्यात आली नाही. शासनाने यापूर्वी ३१ डिसेंबर ही तिथी निश्चित करुन दिली होती श्रीकांतदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी. 
बातम्या आणखी आहेत...