आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवू, महापौर अिभषेक कळमकर यांची मािहती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील बाजारपेठांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. शहरातील बाजारपेठा अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवू, असे महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले.
गंज बाजार येथील सप्तशंृगी माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महापौर कळमकर यांच्या हस्ते महाआरती भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सराफ संघटनेचे अध्यक्ष संतोष वर्मा, अनिल पोखरणा, संजय चोपडा, बाळूशेठ मालू, महावीर कांकरिया, निखिल धंदेकर, अजय बोरा, प्रशांत धलपे, सचिन चोपडा, मनोज खत्ती, आशिष साळुंके, राकेश गालपेल्ली आदी उपस्थित होते. कळमकर म्हणाले, बाजारपेठ समस्यामुक्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या बरोबरीने कायम कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्तविकात संतोष वर्मा म्हणाले, गंजबाजार, सराफ बाजार व्यापारी संघटनेच्या वतीने महापौर कळमकर आमदार संग्राम जगताप यांच्याकडे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. यावर महापौरांनी तातडीने कारवाई करून अतिक्रमणे काढल्याने बाजारपेठेचा श्वास मोकळा होण्यात मदत झाली.