आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर चढून युवतीने घेतले दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - शनिशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन एका युवतीने शनिवारी दुपारी तेल अर्पण करून दर्शन घेतले. चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलने केली, पण त्यांना यश आले नव्हते. या युवतीने मात्र सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन केलेल्या या बंडखोरीची पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे.

शनिदेवाची शिळा उघड्यावर असून सर्वांना दुरून दर्शन घेता येते. चौथऱ्यावर केवळ पुरुषांना ओलेत्या वस्त्राने जाण्याची मुभा आहे. महिला चौथऱ्याखालूनच दर्शन घेतात. शनिवारी भाविकांची मोठी गर्दी होती. दुपारी साडेतीन वाजता अठरा ते वीस वयोगटातील एक युवती थेट चौथऱ्यावर गेली. तिने शनिदेवावर तेलाचा अभिषेक करत दर्शन घेतले. हा प्रकार थोड्या उशिरा सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आला. त्यांनी आरडा-ओरडाही केला, परंतु गर्दीचा फायदा घेत युवती निघून गेली. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही विश्वस्त मंडळाकडे उपलब्ध आहे. विश्वस्त मंडळाचे कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने चर्चा करून संबंधित सुरक्षा रक्षकांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले. रविवारी पुन्हा विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्‍या अध्‍यक्षांची प्रतिक्रीया..