आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर, अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी सुरू केलेला संप २३ दिवसांनंतरही सुरूच आहे. संपामुळे अंगणवाड्यांमधील बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात हजार ५०५ अंगणवाड्यांपैकी केवळ ९७५ अंगणवाड्या सुरू आहेत. उर्वरित हजार अंगणवाड्या बंदच अाहेत. 
 
नगरसह राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनिसांनी मानधन वाढीसाठी ११ सप्टेंबरपासून संप सुरू केला होता. संपाची दखल घेत राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार मदतनिसांच्या मानधनात एक हजार रुपयांनी वाढ करून भाऊबीज रकमेत देखील वाढ केली होती, तरी देखील संप सुरूच आहे. जिल्ह्यात एकूण हजार ५०५ अंगणवाड्या असून, आदिवासी तालुका असलेल्या अकोले तालुक्यात सर्वाधिक ३२७ अंगणवाड्या आहेत, तर राजूरमध्ये २४८ अंगणवाड्या आहेत. संगमनेर तालुक्यात १६५, संगमनेर तालुक्यातील घारगाव एकमध्ये २३०, तर घारगाव दोनमध्ये १६७, शेवगाव तालुक्यात ३२४, कर्जत तालुक्यात ३७५, राहुरी तालुक्यात ३५७, श्रीरामपूर तालुक्यात २६१, नेवासे तालुक्यात २४८, नेवासे तालुक्यातील वडाळा येथे १९३, जामखेड तालुक्यात २७६, नगर तालुक्यात १९६, उत्तर नगरमध्ये २८७, भिंगार १६९, पारनेर ४१२, पाथर्डी २९१, श्रीगोंदे २६१, बेलवंडी १५०, कोपरगाव २५० राहाता तालुक्यात ३१८ अशा हजार ५०५ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाकडून पोषण आहार पुरवला जातो. मात्र, संपामुळे यातील बहुतांशी अंगणवाड्या बंद आहेत. 

त्यामुळे राज्य सरकारने आशा वर्करमार्फत या अंगणवाड्या सुरू केल्या असून, केवळ पारनेर तालुक्यातील ४५ आशा वर्करच्या माध्यमातून अंगणवाड्या सुरू झाल्या आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत १०८ अंगणवाड्या सुरू झाल्या आहेत. बचत गटामार्फत ८२२ अंगणवाड्या सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत ७०२ अंगणवाडी सेविका, ६७० मदतनीस ११० मिनी अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या आहेत. उर्वरित अंगणवाडी सेविका मदतनीस संपावरच असून, जिल्ह्यातील हजारांहून अधिक अंगणवाड्या संपामुळे अजूनही बंदच आहेत. त्यामुळे बंद असलेल्या अंगणवाड्यातील बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दरम्यान, आदिवासी तालुका असलेल्या अकोले तालुक्यात सर्वाधिक अंगणवाड्या अाहेत. प्रामुख्याने आदिवासी तालुक्यातच बालकांच्या कुषोषणाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे राज्य सरकारने आदिवासी तालुके समाेर ठेवून अंगणवाड्यांना पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला होता. पोषण आहारावर सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते, मात्र, संपामुळे अकोले तालुक्यातील बहुतांशी अंगणवाड्या बंद असल्यामुळे या तालुक्यातील बालके पोषण आहारापासून वंचित रहात आहेत. 
 
अंगणवाड्यांत शुकशुकाट 
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनिसांचा संप सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी अंगणवाड्यांमध्ये संपामुळे शुकशुकाट आहे.
 
दिवाळीपूर्वी मानधनात वाढ करा 
अंगणवाडीसेविका मदतनिसांना सरकारकडून अत्यंत कमी मानधन दिले जाते. या तुटपुंज्या मानधनात घरचा खर्चही भागत नाही. त्यात मिळणारे मानधनही वेळेवर दिले जात नाही. मानधनाच्या तुलनेत कामाचा बोजा जास्त आहे. त्यामुळे सरकारने दिवाळीपूर्वीच मानधनात भरीव वाढ करावी. 
- वंदना पडोळे, अंगणवाडी मदतनीस. 
 
बातम्या आणखी आहेत...