आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहरातील सर्वच एटीएममध्ये खडखडाट, पैसे नसल्यामुळे ग्राहकांचे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शनिवारी व रविवारी बँका बंद होत्या. त्यामुळे शहरातील बहुतेक बँकांच्या एटीएममध्येही खडखडाट होता. एटीएम सेवा विस्कळीत झाल्यामुळे ग्राहकांचे हाल झाले.
 
शहरातील पाइपलाइन रस्ता, प्रोफेसर कॉलनी, भिस्तबाग नाका, प्रेमदान चौक, दिल्ली दरवाजा, रंगारगल्ली, नवनागापूर, बागडपट्टी, नालेगाव, केडगाव या भागातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, एचडीएफसी, आयडीबीआय, तसेच युनियन बँकेच्या एटीएममध्ये चलनाचा तुटवडा होता. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी भटकंती करावी लागली. पैसे नसल्यामुळे ग्राहकांचे हाल झाले. पैसे नसल्यामुळे कामे पुढे ढकलावी लागली. लग्नसराईची सोमवारी मोठी तीथ असल्यामुळे ग्राहक एटीएममध्ये चकरा मारत होते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...