आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२१ कोटींचा बालिकाश्रम रस्ता अद्याप अंधारातच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेने सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला अडीच िकलोमीटर लांबीचा बालिकाश्रम रस्ता अद्याप अंधारातच आहे. या रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याने तेथील रहिवाश्यांची वाहनचालकांची गैरसोय होत आहे. पथदिवे सुरू करण्याची मागणी वेळोवेळी करूनही महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. दोन-तीन दिवसांपासून दिवे बसवण्याचे काम सुरू झाले असले, तरी ठरावीक भागातच ते बसवण्यात येत आहेत. पथदिवे संपूर्ण रस्त्यावर बसवण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
नगररोत्थान अभियानांतर्गत २१ कोटी रुपये खर्च करून बालिकाश्रम रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. सुशोभीकरण अजून व्हायचेच आहे. संबंधित ठेकेदाराने करारनाम्यातील अटी शर्तींप्रमाणे सर्व कामे पूर्ण केली नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. रस्त्याच्या एस्टीमेटमेटमध्ये पदपथ, दुभाजक, पथदिवे, वृक्षलागवड यासारख्या अनेक बाबींचा समावेश होता. परंतु संबंधित ठेकेदार संस्थेने अनेक कामे अपूर्ण ठेवली आहेत. माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी स्वत: उभे राहून रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले. परंतु ते निवृत्त झाल्यानंतर या कामाकडे एकाही अधिकाऱ्याने विशेष लक्ष दिलेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जासह इतर कामे पूर्ण करण्याकडे संबंधित ठेकेदार संस्थेने दुर्लक्ष केले. ज्या रस्त्यासाठी तब्ब्ल २१ कोटी रुपये खर्च करण्यात आले, तो रस्ता गेल्या वर्षभरापासून अंधारात होता. पथदिवे बसवण्याच्या कामाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी पथदिवे बसवण्यात आले, परंतु त्यापैकी बहुतेक दिवे बंदच होते. काही ठिकाणी अद्याप दिवेच बसवलेले नाहीत. केवळ ठरावीक भागापुरते पथदिवे बसवता ते संपूर्ण रस्त्यावर बसवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने दोन दिवसांपासून दिवे बसवण्याचे काम सुरू केले, परंतु संबंधित अधिकारी कर्मचारी मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

बालिकाश्रम रस्त्याबरोबरच मंजूर झालेल्या भुतकरवाडी ते पंम्पिंग स्टेशन रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाचे हे काम मागील काही दिवसांपासून पुन्हा सुरू झाले, परंतु त्याला अद्याप गती मिळालेली नाही. संबंधित ठेकेदार संस्थेने या रस्त्यावरील विजेच्या खांबांचे अद्याप स्थलांतर केलेले नाही. हे खांब रस्त्याच्या मधोमध, तसेच ठेवून काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

रस्त्यावर दोन्ही बाजूने फुटपाथ आवश्यक आहेत. निविदेमध्ये तशा अटी-शर्ती आहेत. परंतु ठेकेदाराने दुर्लक्ष करत ठरावीक ठिकाणीच फुटपाथ केले. संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूने फुटपाथ करणे आवश्यक होते, परंतु तसे झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली चेंबरची झाकणे उघडीच आहेत.
बातम्या आणखी आहेत...