आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारा दिवसांत बँकांत जमा झाली १६०९ कोटींची रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाचशे हजारच्या नोटाबंदीनंतर शहर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत खासगी बँकांमधून गेल्या बारा दिवसांत तब्बल १६०९ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून, ४२३ कोटी रुपयांच्या पाचशे हजारच्या नोटा बदलण्यात आल्या.बँकांच्या मते गेल्या दहा वर्षांत प्रथमच मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्रात मोठ्या रकमेची उलाढाल झाली. दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर तब्बल बारा दिवसांनी जिल्ह्यातील शंभर एटीएम मशीनचे सेटिंग पूर्ण झाले असून, उर्वरित ३६० एटीएमच्या सेटिंगचे काम सुरू आहे.
केंद्र सरकारने नोव्हेंबरला पाचशे हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बँकांचे व्यवहार दुपटीने वाढले असून, कधीही बँकेत येणारे नागरिक प्रथमच बँकेत येऊन नोटा बदलून घेत आहेत. अनेकजणांनी जनधन योजनेत बँकखाते उघडले. मात्र, त्यातून कुठलेच व्यवहार केले नव्हते. तेदेखील बँकेत येऊन या खात्यात जुन्या पाचशे हजारांच्या नोटा भरून त्या बदल्यात नव्या दोन हजारच्या नोटा काढून घेत आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी बँकांमधून दररोज सुमारे ५० कोटींची आर्थिक उलाढाल होत असे. मात्र, गेल्या १२ दिवसांत त्यात दुपटीने वाढ झाली आहे. सहकारी बँका पतसंस्था वगळता विविध राष्ट्रीयीकृत खासगी बँकांमधून दरारोज १०० कोटींची उलाढाल झाली. नगर शहर जिल्ह्यात १५० हून अधिक बँका आहेत. ग्रामीण भागात या बँकांच्या ३०० पेक्षा जास्त शाखा आहेत. जिल्ह्यात विविध बँकांचे सुमारे चार लाख खातेदार आहेत. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना नोटा बदलण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या, तरी बँका मात्र मालामाल झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत खासगी बँकांच्या तिजोऱ्या फुल्ल झाल्या असून, जुन्या नोटा कुठे ठेवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. ते २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत खासगी बँकांत कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. लाखो बँक ग्राहकांनी विविध बँकखात्यांतून हजार ६०९ कोटींची रक्कम जमा झाली. बँकेत जाऊन ४२३ कोटींच्या हजार पाचशेच्या नोटा बदलून घेतल्या आहेत. टपाल कार्यालयांतूनही सुमारे २०० कोटींच्या नोटा बदलून घेतल्या गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बँका एटीएममधील गर्दी आता रोडावली आहे. जिल्ह्यात ४६० विविध बँकांचे एटीएम आहेत. त्यापैकी शंभर एटीएम मशीनची सेटिंग पूर्ण झाली असून, ३६० एटीएमच्या सेटिंगचे काम सुरू आहे. सहकारी बँका पतसंस्थांना जुन्या पाचशे हजारांच्या नोटा बदलून देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिल्याने सहकारी बँक पतसंस्थांचे व्यवहार ठप्प असून, त्यांना परवानगी असती, तर आर्थिक व्यवहारांत मोठी वाढ झाली असती. पाचशे हजारच्या नोटांच्या बदल्यात नव्या दोन हजारांच्या नोटा दिल्या जात असल्या, तरी दोन हजारचे सुटे मिळत नसल्याने नागरिकांची अडचण झाली आहे. बँक व्यवस्थापनाने मागणी करूनही नव्या पाचशेच्या नोटा मिळत नसल्याने जुन्या नोटांच्या बदल्यात केवळ दोन हजारच्या नोटा ग्राहकांना द्याव्या लागत आहेत.

नोटाबंदीनंतर जिल्ह्यातील शेती, व्यवसाय, व्यापार, उद्योग, कामगार या क्षेत्रावर काय परिणाम झाला, याची माहिती राज्याचे कॅबिनेट मुख्य सचिवांनी सोमवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडून व्हिडिआे कॉन्फरन्सद्वारे घेतली. नगर निवास येथील कार्यालयात जिल्हाधिकारी कवडे यांनी विविध बँकांकडून आलेल्या माहितीचे सादरणीकरण क्षेत्रीय यांच्यापुढे केले.

शेतकऱ्यांकडून खतासाठी पाचशे हजारच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांबरोबर चेकने व्यवहार करत आहेत. केंद्र सरकारने महाबीज कंपन्यांना शेतकऱ्यांकडून खतासाठी पाचशे हजारांच्या नोटा स्वीकाराव्यात, असे निर्देश दिले आहेत, असे कवडे यांनी सांगितले. जिल्ह्यात २४४ एटीएम सुरू आहेत. नोटाबंदीनंतर ४० % उलाढाल मंदावली आहे, असेही त्यांनी सांगितले.

बँकांची आर्थिक उलाढाल वाढली
^पाचशे हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विविध बँकांमधील आर्थिक उलाढाल वाढली आहे. विविध राष्ट्रीयीकृत खासगी बँकांमधून सुमारे हजार कोटींच्या पाचशे हजारांच्या नोटा ग्राहकांनी बदलून घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात बँकांमध्ये ज्या प्रमाणात गर्दी होती, ती आता दिसत नाही. जिल्ह्यातील १०० एटीएममध्ये नव्या दोन हजारच्या नोटेची सेटिंग बसवण्यात आले आहे. -आर. एम. दायमा, व्यवस्थापक, अग्रणी बँक.
बातम्या आणखी आहेत...