आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर जिल्ह्याला हवेत आणखी ८०० कोटी, ३४४ एटीएमची सेवा सुरळीत झाल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाचशे हजारच्या नोटाबंदीनंतर नगर शहर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत खासगी बँकांमध्ये गेल्या वीस दिवसांत हजार ७५० कोटी रुपये जमा झाले. बँकांमधून ४२५ कोटींच्या पाचशे हजारच्या नोटा बदलून घेण्यात आल्या आहेत. अनेक बँकांत अजूनही नव्या नोटांचा तुटवडा असून, सर्व बँकांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी जिल्ह्याला किमान आणखी ८०० कोटी रुपयांची गरज आहे. दरम्यान, ३४४ एटीएमची सेवा सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र अनेक एटीएममध्ये पैसेच नसल्याने हा दावा फोल ठरला आहे.
केंद्र सरकारने नोव्हेंबरला पाचशे हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बँकांतील व्यवहार दुपटीने वाढले. गेल्या वीस दिवसांत सहकारी बँका पतसंस्था वगळता विविध राष्ट्रीयीकृत खासगी बँकांमध्ये हजार ७५० कोटी रुपये जमा झाले आहेत. ४२५ कोटींच्या हजार पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्यात आल्या आहेत.

नोटाबंदीनंतर विसाव्या दिवशीही बँकिंग सेवा पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नाही. बँकांतून थेट नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबल्याने सध्या बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी झाली असली, तरी बँकखात्यात पाचशे हजारच्या नोटा बदलून मिळत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बँका, एटीएम टपाल कार्यालयांत नोटा बदलण्यासाठी रांगा दिसत होत्या. मात्र, आता रांगा नाहीत. जिल्ह्यातील सर्व बँकांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी आणखी ८०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
सध्या बँका एटीएममधून दोन हजारांच्या नोटा मिळतात. तथापि, दोन हजारांचे सुटे मिळत नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. विविध बँकांनी नव्या पाचशे रुपयांची मागणी केली आहे. मात्र, ती पूर्ण झालेली नाही. काही बँकांत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आल्या असल्या, तरी एटीएमचे सेटिंग पूर्ण होईपर्यंत त्यांचे वितरण केले जाणार नसल्याचे सांगण्यात येते. पाचशे रुपयांच्या नव्या नोटा जुन्या पाचशे रुपयांप्रमाणेच असल्याने त्या जुन्या पाचशे रुपयांचा नोटांचा भरणा करताना गैरप्रकार होण्याची भीती बँकांना असल्याने त्यांचे वितरण थांबवण्यात आले आहे.

३४४ एटीएम सुरळीत झाल्याचा दावा
बँकेतून नोटा बदलण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे नोटा बदलण्याचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. विविध बँकांची जिल्ह्यात ४६० एटीएम आहेत. त्यापैकी ३४४ एटीएमची सेवा सुरळीत करण्यात आली आहे, असा दावा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर. व्ही. दायमा यांनी केला.

जनधनच्या खात्यात ९४ कोटी झाले जमा
जनधन योजनेत शून्य रकमेत नगर जिल्ह्यात लाख ४९ हजार बँकखाती उघडण्यात आली. ते ३० नोव्हेंबरपर्यंत जनधनची नवी हजार खाते उघडण्यात आली. या खात्यांत ८४ कोटी जमा झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बँकेत खाते उघडणाऱ्यांची संख्या अाणखी वाढणार आहे.
बातम्या आणखी आहेत...