आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडावर राजकीय सभा, मेळावे नकाेतच; महंत नामदेवशास्त्रींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - दसऱ्यानिमित्त भगवानगडावर राजकीय, वैयक्तिक, सामाजिक मेळावे, सभा व अन्य समारंभाना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी भगवानगड ट्रस्टचे अध्यक्ष महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हा प्रशासनाने मागील वर्षी भाषणबंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना अखेर गडाच्या पायथ्याशी सभा घ्यावी लागली होती.
 
गड व राजकारण हे दोन विषय वेगळे करून गडाचे महात्म्य, पावित्र्य व परंपरा अबाधित राहावे म्हणून मागील वर्षांपासून गडाच्या विश्वस्त मंडळाने दसरा मेळाव्यात भाषणबंदीचा निर्णय घेतला. यामुळे पंकजांच्या समर्थकांनी ४ महिन्यांपूर्वी गडाच्या पायथ्याशी जमीन घेतली आहे. त्यामुळे तेथे किंवा मागील वर्षी झाला तेथे मेळावा होऊ शकतो. नामदेवशास्त्री यांनी निवेदनात म्हटले आहे, भगवानगड ब वर्ग तीर्थक्षेत्र असून ट्रस्टच्या ठरावाविरुद्ध राजकीय, वैयक्तिक व सामाजिक मेळाव्यास किंवा सभेस परवानगी दिल्यास अतिगंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्यास जबाबदारी शासनावर राहील. ट्रस्टने यंदा नेते, व्हीआयपींना निमंत्रण दिलेले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाथर्डीच्या कार्यकर्त्यांनी मेळावा नियोजनाबाबत पंकजांची मुंबईत भेट घेऊन निमंत्रण दिले होते. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत कार्यकर्त्यांची बैठक झाली. बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकसुद्धा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे  दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
बातम्या आणखी आहेत...