आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा धरण 70 % भरले, मुळाचा साठा 44 टक्क्यांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे विहंगम दृश्य. - Divya Marathi
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे विहंगम दृश्य.
भंडारदरा - भंडारदराधरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभर चांगला पाऊस झाल्याने साठा ७० टक्क्यांवर गेला आहे. पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे येथेही चांगला पाऊस होत आहे. मुळाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणाचा पाणीसाठाही वेगाने वाढत ४४ टक्क्यांवर गेला आहे. स्थिती अशीच राहिली, तर भंडारदरा धरण जुलै अखेरपर्यंतच भरण्याची शक्यता आहे. याशिवाय मुळा धरणही यंदा भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 
मंगळवारी बुधवारी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर एकदम कमी झाला होता. बुधवारी रात्री उशिरा पावसाचा जोर पुन्हा वाढला. गुरुवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सर्व परिसर पुन्हा एकदा जलमय झाला आहे. भंडारदरा धरणाच्या पाण्यात लक्षणीय वाढ होऊन सायंकाळी साठा सात हजार ७३० दशलक्ष घनफुटांहून अधिक झाला. पाणी वेगात वाढत असल्याने धरणातून वीजनिर्मितीसाठी होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात येऊन तो ८४९ क्युसेक झाला. याशिवाय अंब्रेला फॉल येथूनही १७३ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अंब्रेला फॉल पाहण्यासाठी गर्दी उसळली. हा दोन्ही विसर्ग मिळून एक हजार १२ क्युसेकने पाणी निळवंडे धरणात जात आहे. त्यामुळे निळवंडे धरणात वेगाने पाणीसाठा वाढून तो गुरुवारी सायंकाळी ३३५० दशलक्ष घनफूट झाला होता. 
 
आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत असल्याने धरणात ३२५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. 
 
मुळात१२ टीएमसी पाणी 
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे मुळा नदीही दुथडी भरून वाहत आहे. कोतूळ जवळ मुळा नदीचा विसर्ग हजार २१२ क्युसेक होता. हे पाणी धरणात जमा होत आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी १२ हजार दशलक्ष घनफुटांहून अधिक झाला आहे. गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणात १६३, निळवंडेत १३६, मुळा धरणात ३५७, तर आढळा धरणात १२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. 
 
भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रापैकी घाटघर येथे गुरुवारी सकाळी २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथे आतापर्यंत २०७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पांजरे येथे २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथे आतापर्यंत १७२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. रतनवाडी येथे २० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तेथे आतापर्यंत २३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. भंडारदरा येथे मिलिमीटर पाऊस, तर एकूण १३४९ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. वाकी येथे (एकूण ११९३) मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. 
 
भंडारदराचा मुंबईशी संपर्क तुटलेलाच 
इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळील दारणा नदीवरील पूल नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून अकोले, राजूर भंडारदरा येथून मंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. या शिवाय मुंबईचे पर्यटकही येथे गाड्य घेऊन येऊ शकत नसल्याने या भागातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. सर्व बस इतर गाड्या फक्त पुलापर्यंत जात आहेत. तेथून प्रवाशांना पूल पायी पार करून घोटीला जावे लागत आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सांगण्यात येत आहे. तो पर्यंत मुंबई-नागपूर महामार्गाने बस नेण्याची प्रवाशांची मागणी आहे. 
बातम्या आणखी आहेत...