आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी सुप्यातूनच परतवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शनिमूर्तीच्या चौथऱ्यावर प्रवेश करणारच, या भूमाता ब्रिगेडच्या इशाऱ्यामुळे नेमलेला कडेकोट बंदोबस्त... पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिलांचा विरोधाचा सूर... देवस्थान परिसरात ओबी व्हॅन्स, कॅमेऱ्यांचा गराडा... दिवसभर लाइव्ह रिपोर्टिंग...असे वातावरण मंगळवारी भाविकांनी शनिशिंगणापुरात अनुभवले.

भूमाता ब्रिगेडचे आंदोलक ७ खासगी बसेस व १५ ते २० कारमधून पुण्याहून आले होते. तथापि नगर पोलिसांनी शिंगणापूरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर चौकाचाैकांत महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होती. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ब्रिगेडला रोखण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. दुपारी ४ वाजताभूमाता ब्रिगेडचा ताफा सुप्यातील हॉटेलजवळ येताच पोलिसांनी अडवला. पाचशेहून अधिक कार्यकर्ते वाहनांतून खाली उतरले आणि त्यांनी घोषणा देत पायी चालायला सुरुवात केली. पोलिसांनी लगेच महिला पोलिसांचा बंदोबस्त बोलावून कडे केले. आंदोलकांनी मग महामार्गावरच बसकण मांडत घोषणाबाजी सुरु केली. तब्बल दीड तास रास्ता रोको करण्यात आला. ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी चौथऱ्यावर गेल्याशिवाय परतणार नाही असा पवित्रा घेतला. ५ वाजता पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबध्दतेच्या हालचाली सुरु केल्या.

साडेपाच वाजता पोलिसांनी सर्वांना एका मंगल कार्यालयात स्थानबध्द केले. अर्ध्या तासानंतर त्यांची सुटका केली. पणकाही कार्यकर्ते माघारी जात नव्हते. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा कारवाई करण्याचा इशारा दिला. साडेसात वाजेपर्यत तृप्ती देसाईंसह काही कार्यकर्ते तेथेच ठाण मांडून होते. अखेर आंदोलन सुरुच ठेवणार असे सांगत तृप्ती देसाई यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला.

टिळेकरांना ओळखले
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह ५०० जणांना सुप्यात अडवून माघारी पाठवल्याची बातमी शिंगणापुरात आली, पण देसाई यांनी आमच्या काही महिला शिंगणापुरात असल्याचे सांगितल्याचा संदेशही मिळाला. त्यामुळे पोलिस सतर्क झाले. चकवा देत शिंगणापुरात धडकलेल्या भूमाताच्या सचिव मनीषा टिळेकर प्रवेशद्वारात मात्र अडखळल्या. पोलिसांनी त्यांना नाव, गाव विचारुन ओळखपत्राची मागणी केल्यामुळे त्या गांगरल्या. पोलिसांनीही त्यांना ओळखले.
फक्त प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू होता. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना स्थानबध्द केले. आंदोलकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.