आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाचा साक्षीदार होतोय कमकुवत; सीनेवरील एेतिहासिक लोखंडी पुलाला घरघर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सीना नदीवर १४४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला धनुष्याकृती कमानींचा लोखंडी पूल पाया कमकुवत झाल्यामुळे धोकादायक बनला आहे. या पुलावरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवून केवळ पादचाऱ्यांसाठी त्याचा वापर केला, तर या पुलाचे आयुष्य आणखी काही दिवस वाढू शकेल. 

सीना पूल किंवा लोखंडी पूल म्हणून ओळख असलेला रेल्वेस्थानक रस्त्यावरील सीनानदीवरचा पूल ब्रिटिशकाळात बांधण्यात आला. तेव्हा पुण्याला जाणारा हाच एकमेव रस्ता होता. पावसाळ्यात नदीला पाणी आले की, वाहने अडकून पडत. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे काम तेव्हा प्रस्तावित होते. त्यादृष्टीने १८६९ मध्ये मेजर ई. पी. गॅम्बिएर या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली सीना नदीवर लोखंडी पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. आठ धनुष्याकृती कमानींचा वापर करून ५३० फुटांचा हा पूल बांधण्यात आला. त्याची रूंदी १७ फूट असून जाड लोखंडी पत्र्याचा वापर करून रस्ता तयार करण्यात आला आहे. नदीपात्रापासून पुलाची उंची १२ फूट इंच असून १७ फूट खोल पाया घेऊन त्याची उभारणी केली गेली. हा पूल बांधून पूर्ण व्हायला चार वर्षे लागली. १८७३ मध्ये पुलाचे काम पूर्ण झाले, तेव्हा त्यावर एकूण ९० हजार ३११ रूपये खर्च झाला होता. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच पूल होता. 

या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुलाचा एकही लोखंडी नट, बोल्ट अजून निघालेला नाही. या पुलाचे शंभर वर्षांचे आयुर्मान पूर्ण झाले, तेव्हा इंग्लंडहून तेव्हाच्या नगरपालिकेला पत्र आले होते. या पुलाचे निर्धारित आयुष्य संपले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. तथापि, तेव्हा नगरपालिकेने आणि नंतर महापालिकेने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. लोखंडी पुलावरून अवजड वाहतूक तातडीने थांबवणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. वाहनांना आडकाठी करणारी लोखंडी चौकट काही काळ उभारण्यात आली होती. पण ती दिसल्याने काही वर्षांपूर्वी एक कंटनेर पुलावर गेला आणि भार सहन झाल्याने पुलाचा लोखंडी पत्रा तुटून तेवढा भाग कोसळला. त्यानंतर या पुलाची थोडी डागडुजी करण्यात आली. तथापि, रिक्षा दुचाकी वाहनांची वाहतूक चालूच ठेवण्यात आली. 

मागील वर्षी लोखंडी पुलाशेजारी नव्या आरसीसी पुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी शेजारचा कॉजवे तोडण्यात आला. नव्या पुलासाठी पाया खोदताना लोखंडी पुलाच्या खाली बाजूसही खोदकाम करण्यात आले. त्यामुळे या ऐतिहासिक पुलाच्या पायाचा आधार कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पुलावर वाहने जाता त्याला हादरे बसू लागले आहेत. आधीच जीर्ण झालेल्या या पुलाला आधार देता उलट त्याला उपसर्ग पोहोचू लागल्याने या पुलाचे आयुष्य झपाट्याने कमी होऊ लागले आहे. या पुलाचा वापर केवळ पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवून वाहनांची वाहतूक पूर्ण बंद केली नाही, तर हा पूल धोकादायक ठरू शकतो. 

स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे 
लोखंडी पुलाचा वापर सुरू ठेवण्याआधी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ अभियंते वास्तुविशारद अविनाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पुलासाठी वापरलेल्या लोखंडी गल्डर्सची क्षमता, त्याला लागलेला गंज, पायाचे बांधकाम याची पाहणी करायला हवी, असे ते म्हणाले. 

पुलावरील सर्व वाहतूक तातडीने बंद करावी 
मी सार्वजनिक बांधकाम विभागात असताना लोखंडी पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल ऐतिहासिक ठेवाच आहे. महापालिकेत शहर अभियंता असताना पुलाच्या सुशोभीकरणासाठी मी प्रयत्न केले. आता शेजारी नवीन पूल होत आहे. त्यामुळे लोखंडी पुलावरील रिक्षा दुचाकी वाहनांची वाहतूक पूर्ण बंद करणे आवश्यक आहे. पुलाला रंग देऊन तेथे बसण्यासाठी बाक ठेवावेत. नदीपात्राची स्वच्छता झाली, तर हा पूल नक्कीच प्रेक्षणीय स्थळ होईल. त्यासाठी फार मोठा खर्चदेखील करावा लागणार नाही.
- एन.डी. कुलकर्णी, निवृत्त शहर अभियंता, महापालिका. 

पूल जतन करण्यासाठीचा प्रस्ताव नाही 
जुना लोखंडी पूल जतन व्हावा, यासाठी कोणत्याही निधीची तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही. परंतु भविष्यात तसा प्रस्ताव तयार करता येईल. लोखंडी पुलाजवळ सात कोटी रुपये खर्च करून नवीन पूल बांधण्याचे काम प्रगतिपथवार आहे. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम दीड वर्षात पूर्ण करायचे आहे. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर या कामाला गती मिळेल.
- प्रतापसिंग रजपूत, शहर अभियंता, महानगरपािलका. 

लकडी पुलाप्रमाणेच लोखंडी पुलाला गार्डन ब्रिजचा दर्जा द्यावा.. 
भिंगारकॅन्टोन्मेंट हद्दीतील लकडी पूल लष्कराने काही वर्षांपूर्वी हेरिटेज ब्रिज म्हणून जतन केला. जुन्या पुलाशेजारी पुरेसे अंतर ठेवून नवा पूल बांधल्यावर जुना पूल केवळ फिरायला येणाऱ्यांसाठी वापरला जात आहे. या पुलावर बाक ठेवण्यात आले आहेत, तसेच जवान अधिकाऱ्यांची नावे असलेले सन्मानदर्शक फलक लावण्यात आले आहेत. गार्डन लाईट लावून परिसरात छान उद्यानही तयार करण्यात आले आहे. अशाच प्रकारे सीना नदीवरील लोखंडी पूलही जतन होणे आवश्यक आहे. 
बातम्या आणखी आहेत...