आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस उलटल्याने 15 प्रवासी जखमी, ढोकेश्वर टाकळी येथील बायपास चौकातील दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढोकेश्वर टाकळी बायपास चौकात अपघात झालेली खासगी आराम बस. - Divya Marathi
ढोकेश्वर टाकळी बायपास चौकात अपघात झालेली खासगी आराम बस.
पारनेर  - तालुक्यातील ढोकेश्वर टाकळी बायपास चौकात आराम बस उलटून झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले. ही दुर्घटना शनिवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास घडली. 
 
भीमाशंकरहून औरंगाबादकडे जात असलेली खासगी आरामबस (एमएच-०४ जीपी-१३३४) टाकळी ढोकेश्वर बायपास चौकात रात्री १:३० च्या सुमारास उलटली. यात १५ जण जखमी झाले. बसमध्ये ५५ प्रवासी होते. जखमींना टाकळी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. बसमधील प्रवासी मुंबईहून बसले होते. ते सर्वजण केरळचे असल्याचे समजते. 
बातम्या आणखी आहेत...