आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर- महामानवाला शहरात अभिवादन, भाजपने ‘भीम’अॅपचा केला प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबेडकर जयंतीनिमित्त नगरमध्ये मिरवणूक काढण्यात आली. - Divya Marathi
आंबेडकर जयंतीनिमित्त नगरमध्ये मिरवणूक काढण्यात आली.
नगर- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शुक्रवारी शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. मार्कटयार्ड चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध पक्ष संघटनातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले. सायंकाळी जयभिमच्या घोषात मिरवणूक काढण्यात आली. 
 
लक्ष्मीकारंजा येथील शहर भाजपच्या कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दशलक्ष भीम अॅप या उपक्रमाचा प्रारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. उपमहापौर श्रीपाद छिंदम, सुनील रामदासी, गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक बाबा वाकळे, मालन ढोणे, सरचिटणीस किशोर बोरा, कालिंदी केसकर, नितीन शेलार, मल्हार गंधे, तुषार पोटे, वसंत राठोड, शिवाजी दहिहंडे, गणेश साठे, लीला आगरवाल, नंदा कुसळकर, छाया रजपूत, किशोर वाकळे, दामोदर माखिजा, प्रसाद बेडेकर, शाकिर शेख, सुभाष साळवे, साहेबराव काते, धनंजय जामगांवकर, संतोष शिरसाठ, दीपक उमाप, सोनम वैरागर, नरेश चव्हाण आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
 
खासदार गांधी म्हणाले, राज्यघटना लिहिणारे डॉ. आंबेडकर यांचा सर्वात मोठा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. कॅशलेश व्यवहारासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या मोबाइल अॅपला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे. कॅशलेस व्यवहारांकरिता सर्वात सोपे सुरक्षित हे भीम अॅप आहे. टप्याटप्याने सर्व व्यवहार कॅशलेश होण्यासाठी हे अॅप फायदेशीर ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिशन दशलक्ष भीम अॅप उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत भीम अॅपचे महत्त्व सांगून त्यांना आपल्या मोबाइलमध्ये भीम अॅप डाऊनलोड करण्यासाठी कार्यकर्ते प्रचार करणार आहेत. राज्य सरकारनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाकरिता मिळवली आहे, असे गांधी यांनी सांगितले. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मार्कट यार्ड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, बाळासाहेब पवार, उबेद शेख, बाळासाहेब गाडळकर, दीप चव्हाण, हनिफ जरीवाला, बाळासाहेब भंडारी, अशोक गायकवाड, बाळासाहेब भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते. 
महापालिकेच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिसप्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी, आयुक्त दिलीप गावडे, उपायुक्त विलास वालगुडे, भालचंद्र बेहरे, मनेष साठे, नगरसेविका नंदा साठे, सुरेश बनसोडे, संजय झिंजे, परिमल निकम, संध्या मेढे आदी यावेळी उपस्थित होते. 
महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष राहुल कोतकर, उपाध्यक्ष किशोर कानडे, संचालक कैलास भोसले, बाबासाहेब मुदगल, बाळासाहेब गंगेकर, नंदा भिंगारदिवे, सतीश ताठे, जितेंद्र सारसर, प्रकाश आजबे, विकास गिते, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, चंद्रकला खलचे, अजय कांबळे, प्रवीण जोशी, राजू गंधे, आनंद तिवारी, पांडुरंग भिंगारदिवे, संतोष गवळी, दीपक भोसले आदी यावेळी उपस्थित होते. 
 
वसुंधरा वुमेन्स फाउंडेशनच्या वतीनेही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापौर कदम, माया कोल्हे, जया गायकवाड, अरुणा गोयल, लतिका पवार, राजश्री मांढरे, छाया रजपूत आदी यावेळी उपस्थित होते. विविध संघटनांच्या वतीने अन्नदानदेखील करण्यात आले. रेल्वेस्टेशन येथील शिवनेरी चौकात संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आमदार जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगरसेवक विजय गव्हाळे, हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, उबेद शेख, संजय झिंजे, संभाजी पवार, सुनील कोतकर, किसनराव लोटके, मीना माने, मकासरे, संदीप साळवे, श्रीधर पवार, लक्ष्मण मोनाळे, दिलीप पवार, रावसाहेब दळवी, हेमंत थोरात, शिवाजी शिवचरण, बाळासाहेब ठाणगे, नंदूमामा लांडगे, राजेंद्र पवार, संकेत गव्हाळे, गौरव गव्हाळे, भाऊसाहेब चौधरी, विजय गायके आदी यावेळी उपस्थित होते. 
 
भुतकरवाडी येथे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आमदार शिवाडी कर्डिले, माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक दगडू पवार, संजू सत्रे, उमेश भांबरकर, आबासाहेब वाघमारे, विजय जगताप, नितीन भिंगारदिवे, चैतन्य सेसे, नितीन गवळी, बाला वारमोडे, अक्षय भगत, अमोल भगत, सागर दळवी, सचिन भिंगारदिवे, दीपक भिंगारदिवे आदी यावेळी उपस्थित होते. 
 
डॉ. आंबेडकर यांचे जीवनकार्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. युवकांनी उच्चशिक्षित होऊन त्यांचे कार्य पुढे घेऊ जावे, असे आवाहन आमदार कर्डिले यांनी केले. डॉ. आंबेडकर यांनी भारताला आदर्श घटना दिली आहे. या घटनेमुळे सर्वांना मूलभूत अधिकार मिळाले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश त्यांनी सर्व जगाला दिला, असे दादा कळमकर यांनी सांगितले. 
 
नऊ मंडळांची मिरवणूक 
मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध नऊ मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली. डीजे पारंपरिक वाद्यांचा मिरवणुकीत समावेश होता. मिरवणूक कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. 
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटोज कशी झाली भीम जयंती.... 
बातम्या आणखी आहेत...