आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य लेखा अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप झिरपे यांना शिवीगाळ धक्काबुक्की करणारे नगरसेवक दिलीप सातपुते यांच्यावर कारवाई करून झिरपे यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, झिरपे यांना मंगळवारी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात नगरसेवक सातपुते यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. 
 
महापालिकेची अार्थिक स्थिती खालावलेली असल्यामुळे अत्यावश्यक सेवांच्या खर्चासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे ठेकेदारांची देयके प्रलंबित आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता प्रलंबित देयकांसाठी नगरसेवकांकडून अवाजवी दबाव आणला जातो. सातपुते यांनी अशाच काही थकीत देयकांसाठी झिरपे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. राजपत्रित अधिकाऱ्यांना शिवीगाळ धक्काबुक्की केल्याने सर्वच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. या घटनेचा आम्ही निषेध करतो. संबंधितांवर कारवाई करून झिरपे यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी संघटनेने केली. 

प्रांताधिकारी वामन कदमख् जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके, अतिरिक्त कोषागार अधिकारी देविदास पाटील, जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी नारायण बनसुडे, बळीराम झिंजे, रमेश कासार, एस. एस. लहाने, एस. एम. देवडीकर, जे. बी. जपे, जी. आर. सूर्यवंशी, आर. कचरे, ए. जी. कुलकर्णी, सुरेश राऊत, एस. एम. देशमुख, सु. ब. पवार, एस. एस. ताठे, प्रतिभा नवगिरे, बा. गो. निर्मळ आदी यावेळी उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...