आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिशुविहारमध्ये अवतरल्या जिजाऊ अन् झाशीची राणी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, जवाहरलाल नेहरू अशी महान व्यक्तिमत्त्वे चक्क शिशुविहारमध्ये अवतरली. निमित्त होते महिला दिनाच्या वेशभूषा कार्यक्रमाचे. सावेडीतील गुलमोहर रस्त्यावरील पालवी शिशुविहारमध्ये महिला दिनाचे अौचित्य साधून वेशभूषेचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या देशातील मुलांना प्रसिद्ध महिला पुरुषांची माहिती करून घेणे हा यामागील उद्देश होता. या कार्यक्रमात मुला-मुलींनी पालकांनी उत्साहाने भाग घेतला. 
 
यशश्री कावेरी हिने झाशीची राणी साकारली, तर मीरा निमगावकर हिने सायना नेहवालची वेशभूषा केली होती. रेवती घोटनकर सुखद राजापुरे यांनी जिजाऊ साकारली. नंदिनी लंके हिने शिक्षिका, आकृती असनिकर हिने बबिता फगोट ,सार्थक शिंदे याने राजीव गांधी, भावेश मोरे याने जवाहरलाल नेहरू, तर अंतरा नरूटे हिने किरण बेदी यांची वेशभूषा साकारली.
 
या कार्यक्रमास विद्याभारती जिल्हा कार्यवाहक अरुण कुलकर्णी, तसेच डॉ. नरूटे, संगीता पुंड आदी उपस्थित होते. मुलांमधील अंगभूत कलागुणांना वाव देणारे पालवी शिशुविहार हे उत्तम व्यासपीठ असल्याचे मत कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.
 
मुलांच्या सर्वांगीण विकास आणि व्यक्तिमत्त्व जडणघडणीसाठी पालवी कटिबद्ध असल्याचे संचालिका प्रज्ञा असनिकर मुग्धा घोटनकर यांनी सांगितले. यावेळी कुलकर्णी दाम्पत्याच्या हस्ते सहभागी मुला-मुलींना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी संचालिका घोटणकर असनिकर यांनी प्रयत्न केले. 
बातम्या आणखी आहेत...