आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील ४३४ शहरांमध्ये अहमदनगर १८३ क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील ४३४ शहरांमधून नगर शहराला १८३ वा, तर राज्यातील ४४ शहरांमधून २२ वा क्रमांक मिळाला. स्वच्छता अभियानांतर्गत शहरात राबवण्यात आलेल्या विविध कामांची पाहणी करून केंद्रीय समितीने हा निकाल जाहीर केला. दरम्यान, स्वच्छतेच्या बाबतीत शिर्डी शहराने नगरला मागे टाकले आहे. शिर्डीला देशात ५६ वा, तर राज्यात क्रमांक मिळाला. या गुणांकावरच शहरासाठी केंद्राकडून मिळाणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानच्या निधीचे स्वरूप निश्चित होणार आहे. 
 
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील शौचालय नसलेल्या कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. हजार ५८२ लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी १७ हजारांचे अनुदान देण्यात आले. तत्कालीन आयुक्त विलास ढगे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, अजय चारठाणकर यांच्या प्रयत्नांनी हे काम समाधानकारक झाल्याने देशातील ५०० शहरांपैकी नगर शहराला २४६ वा क्रमांक मिळाला. शौचालयांसह स्वच्छता अभियानांतर्गत शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम, जनजागृती, विद्यार्थ्यांची रॅली, पथनाट्य असे विविध उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आले. हे सर्व उपक्रम कामांचा केंद्रीय समितीने जानेवारी २०१७ मध्ये सर्व्हे केला. समितीने महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे रेकॉर्ड तपासून, स्थळ पाहणी करून, तसेच नागरिकांना प्रश्न विचारून महापालिकेला गुण दिले. 

स्वच्छता अभियानासाठी एकूण दोन हजार गुण होते. त्यापैकी ९०० गुण महापालिका प्रशासनाच्या रेकॉर्डला, ६०० गुण स्थळ पाहणीला, तर ५०० गुण नागरिकांनी दिलेल्या प्रश्नांना देण्यात आले. केंद्रीय समितीने नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यात देशातील ४३४ शहरांमधून नगर शहराला १८३ वा, तर राज्यातील ४४ शहरांमधून २२ वा क्रमाक मिळाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या गुणांकाच्या आधारावरच केंद्राकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचे स्वरूप निश्चित होणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत शहराला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाल्याने स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. त्यात नगरकरांचाही मोलाचा वाटा असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

समाधानकारक गुण 
^केंद्रीय समितीने पाहणी केल्यानंतर हागणदारीमुक्त शहर जाहीर झाले. त्याचे गुण समितीने दिले नाहीत. कचरा वाहनांवर जीपीएस प्रणाली नसल्यामुळेदेखील काही गुण कमी मिळाले. परंतु जे गुण मिळाले, ते समाधानकारक आहेत. स्वच्छता अभियानास नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी ओला सुका कचरा वेगळा करून टाकावा, तसे झाल्यास शहर स्वच्छतेला अधिक चालना मिळेल.'' भालचंद्रबेहेरे, उपायुक्त, महापालिका. 
 
‘टॉप टेन’ स्वच्छ शहरे 
इंदूर (मध्यप्रदेश), भोपाळ (मध्यप्रदेश), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), सुरत (गुजरात), म्हैसूर (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तमिळनाडू), नवी दिल्ली (दिल्ली), नवी मुंबई (महाराष्ट्र), तिरुपती (आंध्र प्रदेश), बडोदा (गुजरात) 

शिर्डीने मारली बाजी 
शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात आले. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक शिर्डीत येत असतात. त्यामुळे येथील स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर आहे. असे असतानाही प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबवून शिर्डीने देशात ५६ वा, तर राज्यात था क्रमांक मिळवला. त्यामुळे शिर्डीसाठी केंद्राकडून मोठ्या स्वरूपात प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...