आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात अहमदनगर शहर आघाडीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील हजार ५३२ कुटुंबांना शौचालय उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत हजार ४६८ कुटुंबांनी शौचालये बांधली असून ६०८ कुटुंबांचे शौचालय बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. अनुदान घेऊनही अद्याप शौचालय बांधणाऱ्या ४५६ लाभार्थ्यांच्या विरोधात महापालिका गुन्हे दाखल करणार आहे. ज्यांच्याकडे शाैचालय बांधण्यासाठी जागाच नाही, अशा कुटुंबांसाठी शंभर सामूहिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे नगर शहर लवकरच हगणदारीमुक्त होऊ शकेल.
महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील तब्बल हजार ६०० कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे स्पष्ट झाले. या सर्व कुटुंबांना केंद्र राज्य सरकारने बारा हजार महापालिकेने पाच हजार असे एकूण १७ हजार रुपयांचे अनुदान शौचालय बांधण्यासाठी दिले आहे. या अभियानांतर्गत काेटी २१ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून हजार ५३२ लाभार्थी कुटुंबांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यातून हजार ४६८ कुटुंबांनी शौचालये बांधली आहेत. ६०८ कुटुंबांच्या घरात शौचालय बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ज्या कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्यासाठी जागाच नाही, अशांसाठी अभियानांतर्गत शंभर सामूहिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. सामूहिक शौचालयातील एका सीटचा लाभ पाच ते सात कुटुंबांना होऊ शकेल. शंभर सामूहिक शौचालयांतून अशा सुमाो पाचशे ते सहाशे कुटुंंबांना लाभ मिळणार आहे.
ज्या लाभार्थ्यांनी अनुदान घेतले, परंतु अद्याप शौचालय बांधलेच नाही, अशांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा नगर शहराला मोठा फायदा झाला आहे. सुमारे तीन हजारपेक्षा जास्त कुटुंबांना या शौचालयाचा लाभ होणार आहे. त्यातून शहराची वाटचाल स्वच्छतेकडे होण्यास मोठा हातभार लागणार आहे. जानेवारी २०१७ पासून शहरासह राज्यभरात स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण राज्य हगणदारीमुक्त होणार आहे.

संचालकाचा आढावा
स्वच्छमहाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक उदय टेकाळे मंगळवारी महापालिकेत शौचालयांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. प्रशासनाने १३६८ शौचालयांची छायाचित्रे सरकारी संकेतस्थळावर अपलोड केले आहेत. राज्यातील शौचालयाचे पहिले छायाचित्र नगरने संकेतस्थळावर अपलोड केले होते. तत्कालिन आयुक्त विलास ढगे यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

कारवाई करणार
^अनुदान घेऊनही शौचालये बांधली नाहीत, अशांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. अशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सभागृहात झालेल्या निर्णयानुसार या लाभार्थ्यांना आणखी आठ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. जे लाभार्थी शौचालये बांधण्याचे काम सुरू करतील, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार नाही. -आर. जी. मेहेत्रे, प्रकल्पप्रमुख.
बातम्या आणखी आहेत...