आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षण करणारे सैनिक हे खरे हीरो- आशा साठे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशाचे रक्षण करणारे सैनिक हेच खरे हीरो आहेत. शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान महत्त्वाचा आहे. जी महिला देशासाठी आपला मुलगा किंवा पती देऊ करते, तिचा त्याग जगातील सर्व त्यागापेक्षा मोठा आहे, असे प्रतिपादन नगर जिल्हा माजी सैनिक महिला बचतगटाच्या अध्यक्ष आशा साठे यांनी केले. 
 
क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वीर माता वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मयूर बोचूघोळ यांनी केले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ महिलांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. शारदा होशिंग, जालिंदर बोरुडे, अमोल खाडे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 
 
प्रास्ताविकात बोचूघोळ म्हणाले, वीरमाता, वीर पत्नी यांचे जगणे सामान्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व महिलांना ग्रंथ भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले, तर आभार विलास भोपळे यांनी मानले. 

या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी मनीष गोधडे, प्रवीण बोगावत, अमित मिसाळ, प्रसन्न बीडकर, वैभव ताकपिरे, अविनाश परळकर, गणेश गुजराती, विजय मडके, धनंजय पाठक, अभिनंदन ढोरे, दीपक वाऊत्रे, चेतन शिरसूल, अमोल थोरात, अनुप पाटोळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 
बातम्या आणखी आहेत...