आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पकार कांबळे 11 विविध संग्रहालये उभारून देणार नगरला वेगळी ओळख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच नगरचे नाव या क्षेत्रातही जगभर नेण्यासाठी प्रसिद्ध शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे नगर शहरात ११ विविध विषयांवरील संग्रहालये उभारणार आहेत. कांबळे यांनी नगरच्या महावीर कलादालनात काढलेल्या ‘सारे जहॉं से अच्छा’ या पेन्सिल चित्राला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. 
 
नगर शहर ऐतिहासिक आहे. पण, येथील ऐतिहासिक वास्तूंची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाली आहे. नगरमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना शहरात काय दाखवायचे, हा नेहमीच यजमानांसमोर मोठा प्रश्न असतो. ही अवस्था दूर करण्यासाठी नगरमध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण काम करावे लागेल. हे ठरवूनच कांबळे यांनी या संग्रहालये उभारणीचा संकल्प केला आहे. 
 
शहरात अशी वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालये उभारायची की पाहण्यासाठी तीन दिवसही पुरणार नाहीत, इतकी ती भव्यदिव्य वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कांबळे त्यावर काम करत आहेत. या सर्व संग्रहालयांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन त्यांनी महावीर कलादालनात ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित केले आहे. नगर शहराला नवी ओळख देण्याची क्षमता असलेल्या या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 
 
यात पहिले संग्रहालय असेल ते ‘विशाल साई’ असेल. नगर जिल्ह्याला साईबाबांच्या शिर्डीमुळे जगात ओळख मिळाली आहे. धार्मिक पर्यटनाचे ते अतिशय चांगले उदाहरण आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकाला नगर शहरातून जाताना थाबण्यासारखे काहीही नाही. त्याला नगर शहरात थांबवण्यास भाग पडेल. विशाल साई म्हणजे साई बाबांची १११ फूट उंचीची प्रतिकृती, सभोवताली
 
पर्यटकांच्या करमणुकीची, राहण्याची परिसर भ्रमंतीच्या सुविधा तेथे असतील. 
दुसरा प्रकल्प ‘कलर सिटी’चा असेल. वेधकता एकसारखेपणाचे सर्वांना आकर्षण असते. शहरातील काही वास्तू किंवा परिसराला एकाच रंगात एकाच पद्धतीने रंगवून त्या भागाला वेगली ओळख देण्याची ही कल्पना आहे. या प्रकल्पातून शहराचे वेगळेपण पर्यटकांच्या मनावर ठसवणे हा हेतू असेल, असे कांबळे यांनी सांगितले. 
 
यातील तिसरा प्रकल्प कॉफी मग म्युझियमचा असेल. कांबळे यांच्याकडे जगभरातू जमवलेले विविध आकारांचे वेगवेगळ्या पदार्थांच्या साह्याने बनवलेले हजारो मग आहेत. त्यांचे प्रदर्शन यात असेल. हे मग म्हणजे त्या-त्या देशांच्या कला, क्रीडा, संस्कृती, पर्यटन, राजकारण यांचे दर्शन घडवणारी प्रतिके आहेत. 
 
कॉफी मगबरोबरच कांबळे मुखवट्यांचेही संग्रहालय उभारणार आहेत. त्यात त्यांनी जगभरातील ४० देशांतून जमवलेले विविध आकार प्रकारचे सहाशे मुखवटे पाहायला मिळतील. ते सहा मजली इमारतीत हे संग्रहालय असेल. याच म्युझियममध्ये मास्क निर्मिती प्रशिक्षण केंद्र, पर्यटकांसाठी मास्क विक्री केंद्र, मास्क लावून नृत्य, तसेच गायन वादन कला सादर करण्यासाठी सभागृह आदी सुविधा असतील. 
 
गार्डन ऑफ हँडस हा पाचवा वेगळा प्रकल्प असेल. मानवी हातांच्या विविध कलात्मकरित्या केलेल्या रचनांद्वारे कलेची विश्वात्मकता जगासमोर आणण्याची ही वेगळीच कल्पना पर्यटकांना अदभूततेची अनुभुती देईल. या प्रकल्पाद्वारे मानवाच्या सृजनतेची पुर्वापार चालत आलेले अविष्कारांकडे वेगळ्या पध्दतीने पाहण्याची दृष्टि पाहणा-ला आल्याशिवाय राहणार नाही. आकार ही या प्रकल्पाची मध्यवर्ती कल्पना आहे हा अशा प्रकारचा हा एकमेव प्रकल्प असेल याचीही अनुभूती प्रवेशव्दारापासुनच यावी अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
सहावा प्रकल्प टॉरटॉइज म्युझियमचा असेल, असे सांगून कांबळे म्हणाले, की भव्य चार मजले उंच टॉरटॉईज (कासवाच्या) प्रतिकृतीच्या प्रचंड इमारतीतच हे जगात कुठेही नसलेले संग्राहालय साकारण्याची आपली भन्नाट कल्पना आहे. आपले मित्र येथील अभियंता सुवेंद्र धर्माधिकारी यांनी असंख्य प्रकारातील कासवांचा संग्रह केला आहे. या संग्रहातुन ही कल्पना सुचली. या इमारतीचा तळमजला हा कासवाच्या पायांचाच असेल. तिथे सोविनियर शॉप, कॅफेटेरिया, स्थानिक कलाकारांच्या कासवाच्या विविध कलाकृती, वरच्या एका मजल्यावर जगभरातील विविध प्रकारच्या विविध आकारातील कासवांचा संग्रह असेल. एक मजला कासवांचे अक्वेरीयम त्यात विविध जाती-प्रजातीची जीवंत कासव त्याची माहिती, संगोपन संवर्धनाबाबतचे जगभरातील ऑडिओ- व्हिडीओ साहित्य, छोटे थिएटर असे सगळा माहोल ‘टॉरटॉईज’मय असेल. 
 
या शिवाय सचिन तेंडूलकर संग्रहालय, गणपती संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कलाजगत महोत्सव (कला संवर्धन अभ्यास केंद्र, स्मृती कला संग्रहालय असे प्रकल्प त्यात असतील. 
 
संग्रहालयांतून रोजगार निर्मिती 
ही संग्रहालये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असतील. त्यामुळे अगदी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांपासून अनेक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करण्याचा आपला उद्देश असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. शहराच्या विविध भागात स्थानिक कलावंताच्या मदतीने छोटी-छोटी कलादालने उभारणे, नगरच्या ऐतिहासिक वारशाच्यातील वास्तुंच्या प्रतिकृती तयार करणे, केवळ आणि केवळ नगरमध्येच मिळतील अशा स्थानिक कलाकृतीचे उत्पादन करणे, त्यांचे त्या-त्या ठिकाणी स्टॉल लावणे. अशा अनेक कांबळे यांच्या कल्पना आहेत. त्यातून नगरचा चेहरामोहराच अमुलाग्र बदलुन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...