आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला कोठडीत अभ्यासाची पुस्तके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला कोठडीत अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणातील तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे हा पदवीचा विद्यार्थी आहे.
 
त्याला परीक्षा द्यायची असून कोठडीत पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत, असा अर्ज त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.या अर्जावर सरकारी पक्षानेही म्हणणे मांडलेले होते.त्यामुळे आरोपीला विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कोठडीत आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करुन देण्यास न्यायालयाने होकार दिला. दरम्यान, कोपर्डी खटल्यात यादीत नाव नसलेल्या एका साक्षीदाराची साक्ष नोंदवण्याची परवानगी मागण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे शुक्रवारी न्यायालयात त्यासाठी अर्ज केला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...