आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारणगाव येथील शेततळ्यात दोन मुलींसह आईचा बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव- शेततळ्यात बुडून सुनीता गौतम इंगळे (२८, दहेगाव) यांच्यासह त्यांच्या मुली पूजा (११) कार्तिकी (४) यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी १२ च्या दरम्यान तालुक्यातील धारणगाव येथे घडली. धारणागाव येथील बाळासाहेब गांगुर्डे यांच्या शेतात सुनीता इंगळे हिची चुलती मंगल उत्तम वाघ (वेळापूर, कोळपेवाडी) कामाला आहे. त्यांना भेटण्यासाठी सुनीता दोन मुलींना घेऊन गेली होती. धाकटी मुलगी कार्तिकी शेततळ्याजवळ खेळत असताना तोल जाऊन ती तळ्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तिची मोठी बहिण पूजा धावली.
 
 मात्र, तिला वाचवता आले नाही. दोघीही बुडत असल्याचे पाहून त्यांची आई सुनीता हिने दोघींना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज आल्याने पाेहता येत नसल्याने या तिघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच मोठी गर्दी जमा झाली. मात्र, मदत मिळेपर्यंत या तिघींचाही अंत झाला होता. तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातही अशीच दुर्घटना घडली होती. 
 
बातम्या आणखी आहेत...