आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद : जिल्ह्यात गट, गणांसाठी अडीच हजार अर्ज दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेली गर्दी. - Divya Marathi
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेली गर्दी.
नगर - जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ७३ गटांसाठी ९०८, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी हजार ५९९ असे एकूण हजार ५०७ अर्ज दाखल झाले. नवीन चेहऱ्यांबरोबरच काही दिग्गजांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तथापि, रात्री उशिरापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. 
 
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर ७३ गट १४६ गणांसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली. एकीकडे आघाडी, युती महाआघाडीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या, तर दुसरीकडे उमेदवार निश्चितीची धावपळ पक्षपातळीवर सुरू होती. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २७ जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत होती. त्याच दिवशी म्हणजेच बुधवारी निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. जे इच्छुक उमेदवार बुधवारी ऑनलाइन अर्ज नोंदवून त्याच दिवशी तहसील कार्यालयात भरण्यासाठी गेले, त्यांची चांगलीच धावपळ झाली. जिल्हाभरात सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पक्षनेत्यांनी ऐनवेळी एबी फॉर्म उमेदवारांना दिले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना नाराजांची मनधरणी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. 

२७ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अमावस्या असल्याने अवघा एक अर्ज दाखल झाला. २८ जानेवारीला गटांसाठी गणांसाठी ४, २९ जानेवारीला गट गणांसाठी प्रत्येकी ६, ३० जानेवारीला गटांसाठी ३४ गणांसाठी ३०, ३१ जानेवारीला गटांसाठी १४१ गणांसाठी २८५ तर शेवटच्या दिवशी बुधवारी (१ फेब्रुवारी) गटांसाठी विक्रमी ७२३, तर गणांसाठी हजार २७४ अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील ७३ गट १४६ गणांसाठी एकूण हजार ५०७ अर्ज दाखल झाले आहेत. सर्व तहसील कार्यालयांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. निवडणूक विभागाने नियोजित वेळेतच अर्ज स्वीकारून सायंकाळी उशिरापर्यंत एकूण दाखल उमेदवारी अर्जाची संख्या जाहीर केली. 
 

रविवारी अपील 
पात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर रविवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येईल. बुधवारी (८ अपिलावर सुनावणी घेऊन निकाल देण्यात येईल. 

मंगळवारी माघारी 
निवडणूकविभागाने जाहीर केलेल्या पात्र उमेदवारांना मंगळवारी (७ फेब्रुवारी), तर जेथे यादीबाबत अपील दाखल आहे, त्या उमेदवारांना शुक्रवारी (१० फेब्रुवारी) सकाळी अकरा ते तीन या वेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 

आज छाननी 
जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी (२ फेब्रुवारी) सकाळी अकरापासून करून त्यावर निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. 

तालुका निहाय गट (कंसात गणांतील) अर्ज 
अकोले१७ (१८), संगमनेर ९१ (९६), कोपरगाव १११ (१५८), श्रीरामपूर ५४ (१०१), राहाता ३५ (५९), राहुरी ५२ (१२४), नेवासे ११३ (१७४), नगर ७२ (११२), पारनेर ३४ (८४), शेवगाव ६६ (१४९), पाथर्डी ७६ (१५८), कर्जत ४९ (१०३), जामखेड ३९ (५३) श्रीगोंदे तालुक्यात ७३ (१३८). 
 
बातम्या आणखी आहेत...