आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद गट, गणांसाठीचे 96 अर्ज नामंजूर; हजार 390 अर्ज ठरले वैध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषद गटांसाठी ८६३, तर पंचायत समित्यांसाठी हजार ५२७ असे एकूण हजार ३९० अर्ज वैध ठरले. गटातील ३५ पंचायत समिती गणातील ६१ असे ९६ अर्ज अवैध ठरले. हा निर्णय मान्य नसलेल्या उमेदवारांना न्यायालयात धाव घेता येऊ शकेल. 

जिल्हा परिषदेच्या ७३ व १४ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर २७ जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान अर्ज भरण्याची मुदत होती. जिल्हाभरातून जिल्हा परिषद गटांसाठी ८९८, तर पंचायत समिती गणांसाठी हजार ५८८ असे हजार ४८६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (१ फेब्रुवारी) सर्व तहसील कार्यालयांच्या आवारात कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. दाखल झालेल्या अर्जांची गुरुवारी छाननी करण्यात आली. जिल्हा परिषद गटांतील ३५ अर्ज पंचायत समिती गणांतील ६१ अर्ज नामंजूर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याचा निर्णय घेतल्यास त्याविरोधात जिल्हा न्यायालयात रविवारपर्यंत (५ फेब्रुवारी) अपील दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर फेब्रुवारीला मंजूर उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. दरम्यान, जिल्ह्याचे लक्ष अर्ज माघारीकडे लागले आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत १० फेब्रुवारी अाहे. त्यानंतरच रिंगणातील अंतिम चित्र स्पष्ट होईल. 

ज्या उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्या उमेदवारांना अर्ज माघारीसाठी मंगळवारी (७ फेब्रुवारी) ११ ते दुपारी पर्यंत अंतिम मुदत आहे, तसेच ज्या उमेदवारांनी अर्ज नामंजूर केल्याप्रकरणी अपिल केले आहे, त्यांच्यासाठी शुक्रवारी (१० फेब्रुवारी) ११ ते दुपारी पर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे, अशी माहिती देण्यात आली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...