आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : आज निकाल, जिल्हा परिषदेचा किल्ला काँग्रेस, राष्ट्रवादी राखणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी होत आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्र सज्ज करण्यात आली आहे. तेथील संगणक यंत्रणेची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी केली. - Divya Marathi
जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी होत आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्र सज्ज करण्यात आली आहे. तेथील संगणक यंत्रणेची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी केली.
नगर - काँग्रेस राष्ट्रवादी समोर भाजपचे कडवे आव्हान उभे असले, तरी दोन्ही काँग्रेस जिल्हा परिषदेचा गड राखणार असेच चित्र सध्या आहे. भाजपच्या जागा वाढणार असल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. सत्ता स्थापन करताना दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, तर भाजप-शिवसेनेला विरोधी बाकांवर बसावे लागेल. शिवाय आघाडीमुळे फोडाफोडीच्या राजकारणासह घोडेबाजारालादेखील आळा बसेल. 
 
जिल्हा परिषदेचे ७३ गट पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी १६ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी (२३ फेब्रुवारी) दुपारपर्यंत स्पष्ट होईल. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असे चित्र आहे. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी त्यानंतर भाजपचा क्रमांक लागणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत केवळ जागा असलेल्या भाजपने या निवडणुकीत ४० जागांवर विजय मिळवू, असा दावा केला आहे. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीची जिल्ह्यावरील पकड पाहता दोन्ही काँग्रेस जिल्हा परिषदेचा गड कायम राखतील, असा अंदाज आहे. 

निकाल स्पष्ट झाल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसला आघाडी करावी लागेल, अन्यथा दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना अध्यक्षपदी बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क भाजप-शिवसेनेची मदत घेत काँग्रेसला विरोधी बाकावर बसवले होते. भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, तरी त्यांच्या जागा निश्चित वाढणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी भाजपला बरोबर घेत सत्ता काबीज करण्याचे डावपेचदेखील दोन्ही काँग्रेसकडून खेळले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आघाडी झाली, तर शिवसेना-भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागेल. 

आपले आमदार असलेल्या तालुक्यांतून भाजपला मोठी अपेक्षा आहे. तेथे भाजपला कितपत यश मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नेवासे तालुक्यात गडाख पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत क्रांतिकारी शेतकरी आघाडी करत निवडणूक लढवली. त्यात गडाख पिता-पुत्रांना यश मिळाले, तर नेवासे तालुक्यात भाजपच्या पदरात काहीच पडणार नाही. पाथर्डी, कोपरगाव, कर्जत, जामखेड या तालुक्यांतील जागांवरच भाजपची भिस्त आहे. भाजपच्या जागा वाढल्या, तरी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, तर भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागेल. 

दुपारी दोनपर्यंत होणार चित्र स्पष्ट 
जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी साडेसातला जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये सुरू होणार अाहे. नगर तालुक्याची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महासैनिकी लॉन येथे होईल. मतमोजणीसाठी प्रत्येक केंद्रावर शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दुपारी दोनपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. 
 
निकाल स्पष्ट झाल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसला आघाडी करावी लागेल, अन्यथा दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना अध्यक्षपदी बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क भाजप-शिवसेनेची मदत घेत काँग्रेसला विरोधी बाकावर बसवले होते. भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, तरी त्यांच्या जागा निश्चित वाढणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी भाजपला बरोबर घेत सत्ता काबीज करण्याचे डावपेचदेखील दोन्ही काँग्रेसकडून खेळले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आघाडी झाली, तर शिवसेना-भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागेल. 
 
आपले आमदार असलेल्या तालुक्यांतून भाजपला मोठी अपेक्षा आहे. तेथे भाजपला कितपत यश मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नेवासे तालुक्यात गडाख पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत क्रांतिकारी शेतकरी आघाडी करत निवडणूक लढवली. त्यात गडाख पिता-पुत्रांना यश मिळाले, तर नेवासे तालुक्यात भाजपच्या पदरात काहीच पडणार नाही. पाथर्डी, कोपरगाव, कर्जत, जामखेड या तालुक्यांतील जागांवरच भाजपची भिस्त आहे. भाजपच्या जागा वाढल्या, तरी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, तर भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागेल. 
बातम्या आणखी आहेत...