आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफल: बासरीच्या जादुई सुरांनी भारावले रसिक, शास्त्रीय गायनाबरोबर नाट्यसंगीताची मेजवानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला फोटो- शास्त्रीय संगीत सादर करताना पंडित आनंद भाटे, दुसरा फोटो- पंडित विजय घाटे यांच्या विलोभनीय भावमुद्रा, तिसरा फोटो- बासरी वादनात तल्लिन झालेले पंडित हरिप्रसाद चाैरसिया. - Divya Marathi
पहिला फोटो- शास्त्रीय संगीत सादर करताना पंडित आनंद भाटे, दुसरा फोटो- पंडित विजय घाटे यांच्या विलोभनीय भावमुद्रा, तिसरा फोटो- बासरी वादनात तल्लिन झालेले पंडित हरिप्रसाद चाैरसिया.
नगर- पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीतून निघणारे जादुई स्वर... पंडित विजय घाटे यांनी त्यांच्या साथीत तबल्यावर धरलेला ताल... बासरीच्या सुरांनी अनेकदा चकीत होऊन तबल्यावरील थिरकणारी बोटे स्तब्ध होत, तर कधी तबल्याच्या तालांना बासरी ओठांपासून विलग करून पंडितजींची मिळणारी दाद, असा हा सूरमयी कौतुकाचा अद््भूत सोहळा नगरकर रसिकांनी याची देही याची डोळा अन् याची कर्णपटलांनी अनुभवला. त्यावर कळस चढवला तो पंडित आनंद भाटे यांच्या स्वरांनी... चार तास चाललेल्या या सुरांच्या अन् स्वरांच्या शरदोत्सवात रसिक गुंगून गेले होते. या सोहळ्याने रसिकांच्या अंगावर अनेकदा रोमांच उभे केले. तो संपूच नव्हे, अशी रसिकांची भावना होती.
दैनिक दिव्य मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिव्य मराठी पुण्यातील व्हायोलिन अकादमीच्या संयुक्त िवद्यमाने, तसेच सरगमप्रेमी िमत्रमंडळाच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमामुळे गुरुवारची सायंकाळ रसिकांच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरली. रसिकांना जागतिक कीर्तीचे बासरीबादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया तबलावादक पंडित विजय घाटे यांच्या जुगलबंदीची मेजवानी अनुभवायला िमळाली. त्यानंतर लगेच पंडित भाटे यांच्या स्वरांनी सूरमंदिरावर कळस चढवला.

नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे सायंकाळी साडेसहाला हा कार्यक्रम सुरू झाला. पंडित हरिप्रसाद यांनी रसिकांना हरी वेणूतून मंत्रमुग्ध केले. सुरूवातीला त्यांनी राग यमनच्या माध्यमातून जोड, आला करत िवलंबित मध्यलयीच्या माध्यमातून मत्रत्ताल ित्रताल अशा दोन रचना विविध लयकारीतून सादर केल्या. पंडित हरिप्रसादजींना तेवढीच समर्पक साथ संगत केली ती तबलानवाज पद्मभूषण पंडित विजय घाटे यांनी. राग यमनच्या िवस्तापूर्ण दीड तासांच्या प्रस्तुतीने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर रसिकांच्या फर्माइशीवर पंडितजींनी या बहारदार मैफलीची सांगता पहाडीच्या लोकधुनीवरून केली.
छायाचित्रे: मिलिंद बेंडाळे