आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी हल्ला प्रकरण, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे अधीक्षकांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैिनक दिव्य मराठीवरील हल्लाप्रकरणी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीने रविवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना निवेदन देण्यात आले. - Divya Marathi
दैिनक दिव्य मराठीवरील हल्लाप्रकरणी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीने रविवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना निवेदन देण्यात आले.
नगर - दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तोडफोड केल्याच्या घटनेचा पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने निषेध केला. दिव्य मराठी कार्यालयाला पोलिस संरक्षण देण्याची मागणीही संघटनेने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याकडे रविवारी निवेदनाद्वारे केली. संरक्षण देण्याचे आश्वासन डॉ. त्रिपाठी यांनी दिले. 
 
शनिवारी (३१ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास आशिष गायकवाड या मद्यधुंद गुंडाने दिव्य मराठी कार्यालयात घुसून संगणकाची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता गोळ्या घालून ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली. या प्रकाराची माहिती मिळताच पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे मन्सूर शेख महेश देशपांडे यांनी दिव्य मराठी कार्यालयास भेट दिली. सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनीही कार्यालयात येऊन पाहणी केली. त्यांच्या निर्देशानुसार आरोपी गायकवाड याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा गुन्हा नोंदवत असताना पोलिसांसमक्ष आरोपीने पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने रविवारी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून पोलिस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांना निवेदन दिले. आरोपी गुंड प्रवृत्तीचा असल्याने दिव्य मराठी कार्यालयास ब्युरो चीफ मिलिंद बेंडाळे वार्ताहर महेश पटारे यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी समितीने केली. त्यावर डॉ. त्रिपाठी म्हणाले, पत्रकार आणि पोलिस सहकारी म्हणून काम करत असतात. दैनिक दिव्य मराठीवरील हल्ल्याची घटना गंभीर आहे. त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाय केले जातील. कार्यालयाला तत्काळ संरक्षण दिले जाईल. आरोपीची गय केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

यावेळी कृती समितीचे निमंत्रक मन्सूर शेख, महेश देशपांडे, दिव्य मराठीचे ब्युरो चीफ मिलिंद बेंडाळे, महेश पटारे, अरुण नवथर, मकरंद घोडके, रोहित वाळके, सुशील थोरात, नवनाथ खराडे, केदार भोपे, दीपक कांबळे, जाकीर शेख, अमीर सय्यद, मोहसीन अहमद, अनिल हिवाळे, गणेश देलमाडे, बंडू पवार, इक्बाल शेख, मारुती घुले, सरवर तांबटकर, संध्या मेढे, प्रणित मेढे, सुदाम देशमुख, बबलू शेख, विठ्ठल शिंदे, वाजिद शेख,साजिद शेख, लहू दळवी, विक्रम बनकर, यतीन कांबळे, सचिन शिंदे, अशोक झोटिंग, सचिन कलमदाने, सागर दुस्सल, मिलिंद देखणे, अशोक परुडे, मुकुंद भालेराव, रामदास बेंद्रे, सय्यद शब्बीर, संदीप कुलकर्णी अविनाश मकासरे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...