आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपवतेंना ‘डाॅ. आंबेडकर समाजभूषण’ प्रदान, रिमन निकम यांना अहमदनगर भूषण पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकात आयोजित कार्यक्रमात शहर जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर रुपवते यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, तर जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने परिमल निकम यांना अहमदनगर भूषण पुरस्कार जिल्हाधिकारी अनिल कवडे, आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, आयुक्त दिलीप गावडे, महापौर सुरेखा कदम, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, रेश्मा आठरे, संजय झिंजे, उबेद शेख, नगरसेवक विपुल शेटिया, हनिफ जरीवाला, प्रकाश भागानगरे, अंकुश मोहिते, मारुती पवार, अ‍ॅड. शारदा लगड, संध्या मेढे, बाबासाहेब गाडळकर, साधना बोरुडे आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जागर होऊन सुसंस्कृत समाज निर्मितीची गरज आहे. जनसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यघटना अस्तित्वात आली.
बाबासाहेबांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांची जयंती ज्ञानदिनाने साजरी करण्याचा शासनाचा मानस अाहे. डॉ. त्रिपाठी यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेबांच्या घटनेने सर्वसामान्यांना मिळाल्याचे सांगितले. 

आमदार जगताप म्हणाले, युवकांना दिशा प्रेरणा देण्यासाठी महामानवांच्या विचारांची गरज आहे. डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी स्टेशन रस्त्यावरील पशुवैद्यकिय चिकित्सालयाजवळ दहा गुंठे जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उध्दव काळापहाड यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भीमप्रेमी उपस्थित होते. 
 
प्रभाकर रुपवते यांना डॉ. आंबेडकर समाजभूषण, तर परिमल निकम यांना अहमदनगर भूषण पुरस्कार जिल्हाधिकारी अनिल कवडे, आमदार संग्राम जगताप दादा कळमकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
 
बातम्या आणखी आहेत...