आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींना भावले अरविंद कुडिया यांनी रेखाटलेले वारली चित्र...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याआधी नवी दिल्ली येथे झालेल्या प्रदर्शनाच्या वेळी कुडिया यांनी रेखाटलेलं वारली चित्र राष्ट्रपतींना भेट देण्यात आलं होतं. - Divya Marathi
याआधी नवी दिल्ली येथे झालेल्या प्रदर्शनाच्या वेळी कुडिया यांनी रेखाटलेलं वारली चित्र राष्ट्रपतींना भेट देण्यात आलं होतं.
नगर - भिंगार येथील कॅन्टोन्मेंट शाळेतील कलाशिक्षक अरविंद कुडिया यांनी काढलेलं ‘डिव्हाईन तारपा’ हे वारली चित्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना इतकं आवडलं, की हे चित्र मी माझ्या घरी नक्की लावेन, असं त्यांनी आवर्जुन सांगितलं. 
 
राष्ट्रपतींच्या दौऱ्यात त्यांना खास नगरच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा स्पर्श असलेल्या भेटवस्तू देण्यात आल्या. एसीसी अँड एसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी राष्ट्रपतींना देण्यासाठी भिंगार शाळेतील कलाशिक्षक अरविंद कुडिया यांच्याकडून वारली चित्र काढून घेतलं. तारपा हे वाद्य वाजवत नाचणारे आदिवासी या चित्रात दाखवण्यात आले आहेत. नृत्य आणि संगीताचा असीम आनंद घेताना चे यात दिसतात. बेतालातून तालाकडे अशी त्यामागील संकल्पना आहे. या चित्रातील पार्श्वभूमी हिरव्या रंगाची आहे. शेजारी भातपिकाची शेती करणारे शेतकरी आणि मडके घडवणारा कुंभारही दाखवण्यात आला आहे. जीवन कष्टमय असले, तरी त्यातून जगण्याचा आनंद घेता येतो, असा संदेश देणारे हे चित्र आहे. 
 
मेजर जनरल दीक्षित यांनी या चित्राची माहितीही राष्ट्रपतींना सांगितली, त्याचबरोबर चित्र रेखाटणारे कुडिया यांनी सामान्य कुटुंबातील मुलांमधील कलागुण हेरून त्यांना चित्रकार म्हणून पुढे आणण्यासाठी घेतलेल्या कष्टांविषयीही माहिती दिली. चित्र पाहून राष्ट्रपतींनी आनंद तर व्यक्त केलाच, शिवाय हे चित्र मी माझ्या घरात नक्की लावेन, असंही सांगितलं. मेजर जनरल दीक्षित यांनी कुडिया यांचं विशेष अभिनंदन करून त्यांना राष्ट्रपतींचा अभिप्राय कळवला. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...