आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई आणि मुलगी एकाच प्रभागातून लढण्याच्या तयारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत. परंतु इच्छुकांनी मात्र आपापले प्रभाग निश्चित केले आहेत. आता पर्यत झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नवरा-बायको, सासु-सुन निवडुनही आले आहेत. मात्र एकाच कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात लढण्याचा प्रकार घडलेला नाही. मात्र या निवडणुकीत एकाच प्रभागातून आई आणि विवाह झालेली मुलगी एकमेकांविरुद्ध लढण्याच्या तयारीला लागल्या आहेत. या दोघांच्याही पतीराजांची समजुत घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दोघांपैकी कोण माघार घेणार? याबाबत उत्सुकता लागली आहे.
राजकारण नशा मानली जाते. त्यामुळेच राजकारणात कोणी कोणाचा कायम स्वरुपी शत्रु अथवा मित्र राहु शकत नाही. एकेकाळचे शत्रु मित्र होतात तर मित्रही शत्रु होतात.

या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने पुरुषांची मक्तेदारी काही प्रमाणात संपुष्टात आली आहे. परंतु पत्नीच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारणावर पकड ठेवण्याचा प्रयत्न पुरुष मंडळीकडून केला जातो.

याचाच परिपाक म्हणजे पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा खटाटोप आहे. महापालिकेत विद्यमान नगरसेविका महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत असताना विवाह झालेल्या या नगरसेविकेची आई याच प्रभागातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीला लागली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नगरसेविकेच्या आईने अद्याप प्रत्यक्ष निवडणुक लढवलेली नसली तरी नगरसेविकेच्या वडीलांनी मात्र आता पर्यंत दोन वेळा नगरसेवक पद भूषवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पत्नीच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय होण्याचा प्रयत्न सासरेबुवा आणि जावाई दोघेही करीत आहेत.
विशेष म्हणजे अदयाप उमेदवारी निश्चित झालेली नाही. तर सासरेबुवा भाजपच्या मित्र पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर जावई विद्यमान पक्षासह अन्य पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.

दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न
मुलगी आणि आई एकमेकांसमोर मैदानात उतरल्यास त्याचा फायदा कोणाला होईल? कोणाचे नुकसान होईल? याचे तर्क-वितर्क काढले जात आहे. त्यामुळेच काही जण या दोघींच्याही पतीराजांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे. या दोघींपैकी एका पक्षाने एकीला उमेदवारी दिल्यास दुसरीला उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर आहे. कदाचित उमेदवारी निश्चित करण्यासाठीही आई मुलीच्या मदतीला किंवा मुलगी आईला मदत करीत असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरु आहे. कारण दोघींपैकी एकीला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास आणि निवडुन आल्यास फायदा मात्र दोघींचा तसेच दोघींच्या पतीराजांच्या आहेच.

बातम्या आणखी आहेत...