आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात पालिकांसाठी सरासरी ७७% मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, संगमनेर या सात नगरपािलका शिर्डी नगरपंचायतीसाठी रविवारी सरासरी ७७ टक्के मतदान झाले. संगमनेरमध्ये मतदारांना पैसे वाटणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. किरकोळ गैरप्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. ‘लक्ष्मीदर्शना’ची वाट पाहणाऱ्या मतदारांमुळे काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. मतमोजणी सोमवारी (२८ नोव्हेंबर) होणार आहे.
जिल्ह्यातील सात नगरपालिका शिर्डी पंचायतीच्या एकूण १७८ जागांसाठी ३५५ मतदान केंद्रांवर रविवारी मतदान झाले. दुपारी दीडपर्यंत ३६ टक्के, तर साडेतीनपर्यंत सरासरी ५६.७८ टक्के मतदान झाले. पाथर्डीत ७७ टक्के, राहाता शिर्डीत ८३ टक्के, राहुरीत ८० टक्के, श्रीरामपूरला ७० टक्के, संगमनेरला ७४ टक्के, कोपरगावात ७४.५६ टक्के, देवळाली प्रवरा येथे ७२ टक्के मतदान झाले.
श्रीरामपूर येथे किरकोळ लाठीचार्ज वगळता शांततेत मतदान झाले. संगमनेरमध्ये ‘लक्ष्मीदर्शना’च्या प्रतीक्षेत मतदार होते. त्यामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
कोपरगावातील दोन-तीन प्रभागांत किरकोळ कुरबुरी वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदानाची वेळ सायंकाळी साडेपाचला संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांबाहेर मोठ्या रांगा दिसत होत्या. मतमोजणी सोमवारी सकाळी सुरू होईल. दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येतील. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...