आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेर-खांबावर काम करताना कंत्राटी वायरमनचा मृत्यू, शेडगाव येथील दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- विजेच्या खांबावर काम करताना अचानक सुरू झालेल्या वीजप्रवाहामुळे कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना शेडगाव येथे घडली. सुनील भाऊसाहेब क्षीरसागर असे या कामगाराचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत आश्वीच्या महावितरण कार्यालयाला घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. हलगर्जीपणाचा ठपका ठेवत एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. 
 
कंत्राटी कामगाराला आपला जीव गमवावा लागल्यानंतरदेखील १७-१८ तास महावितरणचे अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ संतापले. गाव बंद ठेवत त्यांनी शेडगावहून आश्वीपर्यत पायी मोर्चा नेला. नंतर तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत घटनास्थळी आले. दोषींवर कारवाई होईपर्यत मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव चांगलाच वाढला.
 
मृत सुनील यांच्या जागेवर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी द्यावी, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. ग्रामस्थांचा रोष लक्षात घेत अभियंता सावंत यांनी गुलाबराव डोंगरे या कर्मचाऱ्याला निलंबित केल्याचे जाहीर केले. संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार सोनवणे अभियंता सावंत यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांचा राग काही प्रमाणात आेसरला. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...