आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी तिजोरीत दिवसांत तेरा लाखांचा करमणूक कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केंद्र सरकारने पाचशे हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर करमणूक कर विभागही मालामाल झाला. या विभागाच्या वसुलीत दुपटीने वाढ झाली अाहे. ते १४ नोव्हेंबरदरम्यान तब्बल १३ लाख हजार रुपयांचा करमणूक कर सरकारी तिजोरीत जमा झाला. गेल्या सात दिवसांत शिर्डी उपविभागात सर्वाधिक लाख २८ हजार ८०८ रुपयांचा करमणूक कर मिळाला. सर्वात कमी करमणूक कर पाथर्डी उपविभागात जमा झाला.
केंद्र सरकारने नोव्हेंबरला पाचशे हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी शहर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, तसेच खासगी बँकांमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. बँकेत खातेदाराला जुन्या नोटांच्या बदल्यात दोन हजारांची नोट दिली जात असली, तरी बाजारात सुट्या पैशांचे वांदे आहेत. प्रशासनाने जिल्ह्यात शंभर एटीएम केंद्र सुरळीत सुरु असल्याचा दावा केला असला, तरी बहुतांशी एटीएममध्ये अजून पैशांचा खडखडाटच आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाचा खासगी क्षेत्राला आर्थिक फटका बसला असला, तरी शासकीय कार्यालये मात्र मालामाल झाली आहेत. करमणूक कर विभाग, महावितरण, आयकर विभाग, गौण खनिज विभागाच्या कर वसुलीत चांगलीच वाढ झाली आहे. ते १४ नोव्हेंबर या कालावधीत करमणूक कर शुल्क वसुलीत दुपटीने वाढ झाली. तब्बल १३ लाख ४० हजार रुपयांचा करमणूक कर गेल्या सात दिवसांत सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. गेल्या सात दिवसांत नगर-नेवासे उपविभागाकडे ९८ हजार ४९८ रुपयांचा कर जमा झाला आहे. संगमनेर-अकोले विभागात ३७ हजार २५४ रुपये जमा झाले आहेत. श्रीरामपूर-राहुरी विभागाला ८२ हजार ८५३ रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. कर्जत-जामखेड विभागाला २६ हजार ११७ रुपयांचा कर मिळाला. कोपरगाव-राहता विभागाला लाख २८ हजार ८०८ रुपये, पाथर्डी-शेवगाव विभागाला १९ हजार ३५५ रुपये श्रीगोंदे-पारनेर विभागाला २४ हजार ६६० रुपयांचा कर मिळाला आहे. अनेक महिन्यांपासून करमणूक कर वसुली थंडावली होती, नोटाबंदीनंतर वसुलीत चांगलीच वाढ झाली आहे.

बँकांतीलरांगा कमी, एटीएम मात्र बंदच
विविधबँकांत नव्या दोन हजारांच्या नोटा आल्यानंतर शहर जिल्ह्यातील बहुतेक बँकांमधील गर्दी कमी झाली असली, तरी एटीएम मात्र बंदच आहेत. जिल्ह्यातील शंभर एटीएम सुरु असल्याचे दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने सांगितले होते. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरला. बुधवारी स्टेट बँक वगळता अन्य सर्व बँकांच्या एटीएममध्ये पैशांचा खडखडातच होता.

टोल फ्री क्रमांकावर करा तक्रारी : नोटाबंदीनंतरजिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नोटांबाबतच्या तक्रारीसाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला. १६ नोव्हेंबरला या क्रमांक सुरु झाला. मागील आठ दिवसांत टोल फ्री क्रमांकावर ७८ तक्रारी आल्या आहेत. पेट्रोलपंप, खासगी हॉस्पिटलमध्ये हजार पाचशेंच्या नोटा स्वीकारत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी असून, एटीएममध्ये पैसे नसल्याच्याही तक्रारी शहर जिल्ह्यातील अनेक जणांनी केल्या आहेत.

कोटी वसुलीचे उद्दिष्ट
^करमणूक कर विभागाला २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी कोटी २० लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते १४ नोव्हेंबर या सात दिवसांत जिल्ह्यातील नगर, संगमनेर, श्रीरामपूर, कर्जत, शिर्डी, पाथर्डी श्रीगोंदे या उपविभागातून १३ लाख हजार रुपयांचा करमणूक कर मिळाला. येत्या महिन्याभरात करमणूक शुल्क वसुलीत आणखी वाढ होईल. -वैशाली आव्हाड, करमणूक शुल्क अधिकारी
बातम्या आणखी आहेत...