आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या संपात राजकारण करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री मंत्री शिंदेंचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली. शेतकऱ्यांचे समाधान झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. मात्र, पुन्हा जर शेतकरी संप करत असतील, तर सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घेईल. पालकमंत्री म्हणून मी देखील या शेतकऱ्यांशी संवाद साधेल. मात्र, या शेतकरी संपात राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी केला. 

भाजपच्या शिवार संवाद सभेच्या कार्यशाळेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, यापूर्वीही शेतकरी कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नसल्याने ते शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुढे आणत आहेत. कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा हा प्रयत्न आहे. 

पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. त्यांचे समाधान झाल्यांनंतर हा संप मागे घेण्यात आला. मात्र, पुन्हा जर शेतकरी संप करणार असतील, तर निश्चितपणे सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घेईल. पालकमंत्री म्हणून मी स्वत: या शेतकऱ्यांशी संवाद साधेल. या संपावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, असे त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...