आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री भ्रूणहत्या रोखण्याची जबाबदारी स्त्रियांनीच घ्यावी- महापौर सुरेखा कदम यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- समाजातील सर्व स्त्रियांनी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. स्त्री जन्माचे स्वागत करण्याची जबाबदारी स्त्रियांनीच स्वीकारावी. सध्या स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणात होत असून, त्या रोखण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
 
मुलांपेक्षा मुली कर्तृत्ववान असून, त्या सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले. 
फकिरवाडा येथील जय भवानी महिला बचतगटाच्या वतीने आयोजित जागतिक महिला कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. शारदा लगड होत्या. यावेळी बचतगटाच्या वतीने डॉ. गीतांजली वर्मा, डॉ. स्नेहल कुलकर्णी, डॉ. निशांत शेख, प्रा. कावरे, मुख्याध्यापिका हेमलता बनकर यांचा सत्कार करण्यात आला. 
 
या कार्यक्रमास मंगल बडे, अलका बुधवंत, मीरा बडे, डहाळे, अ‍ॅड. अतिष निंबाळकर, भारत वाघ, भास्कर पांडुळे, महंतप्पा चाँदकोटी, बचतगटाच्या सर्व महिला परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 
 
महिला बचत गटाच्या वतीने नगरसेवक योगीराज गाडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बचतगटाच्या अध्यक्ष नीता भाऊसाहेब काकडे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब काकडे यांनी केले, तर सुवर्णा गाडे यांनी आभार मानले. 
बातम्या आणखी आहेत...