आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतांचे अनुदान थेट शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  राज्य सरकारच्या निर्णयानुसार यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी खते बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी दिली. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात २०१७-१८ खरीप हंगामपूर्व अाढावा नियोजन बैठक पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार दिलीप गांधी, आमदार विजय आैटी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार स्नेहलता कोल्हे,जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले,जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, पुणे येथील कृषी संचालक एस. एल. जाधव, कृषी सहसंचालक विजय इंगळे, महिला बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, नगर तालुका पंचायत समिती सभापती रामदास भोर, पारनेर तालुका पंचायत समिती सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, राज्य सरकारने खते बियाणे खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामापासून खते बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. खरीपात खते बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये,याची दक्षता कृषी विभागाने घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कृषी संलग्न असलेल्या विविध योजनांवरील प्रलंबित अनुदानासाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे उद्दीष्ठ लक्षात घेऊन निधीची मागणी करावी. जलयुक्त शिवार अभियान योजनेत २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात जिल्ह्यात निवडलेल्या गावातील कामांचा आराखडा लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांना एकत्रित घेऊन तयार करावा. जलयुक्तच्या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी िवखे यांनी सात वर्षापुर्वी आत्मार्तंगत शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी सहलीवर नेण्यात आले. ते शेतकरी कर्ज काढून सहलीवर गेले, मात्र अद्याप अनुदान मिळाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.त्यावर पालकमंत्री राम शिंदे यांनी उपस्थित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करुन बैठक संपण्याच्या आता यावर कार्यवाही करावी, अशी सूचना दिली. अकोले येथील जलसंधारणाच्या कामासाठी ३६ लाखांचा निधी आला मात्र कृषी विभागाचे अधिकारी दिशाभुल करत असल्याचा आरोप बैठकीत अकोले येथील सदस्यांनी केला.त्यावर देखील शिंदे यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पडकई योजनेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नाबाबत देखील शिंदे यांनी अधिकाऱ्यांना विचारणा करुन कार्यवाहीच्या सूचना दिल्या.प्रारंभी जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी पंडितराव लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब ऱ्हाटे यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. बैठकी दरम्यान झालेल्या चर्चेत खासदार दिलीप गांधी, आमदार विजय आैटी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार स्नेहलता कोल्हे, सभापती रामदास भोर यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

संभ्रम नको.... 
बैठकीतखासदार दिलीप गांधी यांनी शेतकऱ्यांनी शेतीची कामे केल्यास रोहयोंर्तंगत संबधित शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल, असे सांगितले. त्यावर आमदार विजय आैटी म्हणाले, शेतीची खुरपणी, पेरणी केल्यानंतर हे अनुदान मिळेल का ? असा प्रश्न उपस्थित करुन कार्यकर्ते लोकांत संभ्रम होऊ देऊ नका, असे सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...