आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्यकला जोपासत ‘ती’ बनली उद्योजक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  चारवर्षांपूर्वी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेण्यासाठी नगरहून पुण्याच्या ललित कला केंद्रात गेलेली गीतांजली भापकर नृत्यामुळेच तरुण उद्योजक बनली. या यशाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे इतर मान्यवरांनी तिचे विशेष कौतुक केले. 
 
डिसेंबर २०१६ ते २४ जानेवारी २०१७ दरम्यान विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाने स्वतःची स्वप्नं स्वबळावर साकार करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “स्टार्ट युअर कंपनी” ही स्पर्धा आयोजित केली होती. ८० जणांमधून विविध फेऱ्या पार करत जणांची विजेता म्हणून निवड करण्यात आली. शास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, संशोधन अशा सर्व क्षेत्रातील स्पर्धकांना मागे टाकून कलाकार असलेल्या गीतांजलीने यात बाजी मारली. 

आपल्या यशाचे सर्व श्रेय गीतांजली आई बाबा सर्व नातेवाईकांना देते. समाजाचा विचार करता केवळ नृत्य करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच आज मी स्वावलंबी आहे, असे ती सांगते. तसेच आपले गुरू प्रिया ओगले, ज्येष्ठ कथक नृत्यांगणा शमा भाटे, प्रा. परिमल फडके, डॉ. प्रवीण भोळे यांच्या मार्गदर्शनामुळेच नृत्याला सर्वार्थाने समजून घेऊ शकले. त्यांनी वेळोवेळी नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिले, सर्व गरजेच्या गोष्टी कायम उपलब्ध केल्या, त्यामुळे हा प्रवास सुखद झाला असे ती सांगते. 

^चार वर्षांपूर्वीनगर सोडताना जे स्वप्नं उराशी बाळगले, ते एवढ्या चांगल्या मार्गाने पुर्ण होईल असा विचारही केला नव्हता. नगर सांस्कृतिक क्षेत्रात कायम अग्रेसर शहर आहे. तिथे नृत्याच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य आहे. आजही ७०% लोक नृत्याकडे केवळ मनोरंजन या उद्देशानेच बघतात. मात्र त्यापलीकडे नृत्याची व्यापकता फार मोठी आहे. याच गोष्टीला धरुन “आर्ट गार्डन” ही संस्था लवकरच नगरमध्ये सुरू होत आहे.''
गीतांजलीभापकर. 
 
बातम्या आणखी आहेत...