आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७०० घरकुलांचे काम पूर्णत्वाकडे, प्रत्येक कुटुंबाला मिळणार हक्काचे घर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेने हाती घेतलेल्या सातशे घरकुलांच्या तीन प्रकल्पांचे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल सातशे कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्यासह महापौर अभिषेक कळमकर उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी नुकतीच घरकुलांच्या कामाची पाहणी केली. महिनाभरात घरकुलांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कळमकर यांनी दिली.
केंद्र राज्य शासनाचा एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना रमाई आवास योजनेंतर्गत महापालिकेने दोन वर्षांपूर्वी घरकुलांचे तीन प्रकल्प हाती घेतले. त्यात वारुळाचा मारुती परिसरात २५२ ११३ घरकुलांचे दोन काटवन खंडोबा परिसरात ३०० घरकुलांचा एक अशा तीन प्रकल्पांचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकल्प सध्या पूर्णत्वाकडे आहेत. नगर शहरात स्वत:चे घर घेणे ही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची बाब होत चालली आहे.

पुणे, औरंगाबाद नाशिक शहरांच्या तुलनेत नगरमधील घरांच्या िकमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेच्या माध्यमातून तब्बल सातशे कुटुंबांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्यासह महापौर अभिषेक कळमकर यांनी नुतकतीच या प्रकल्पांच्या कामाची पाहणी केली. घरकुलांसाठी पंधरा दिवसांत वीज, पाणी, तसेच इतर सुविधांची व्यवस्था करण्याचे आदेश कळमकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे सातशे कुटुंबांना त्यांची हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच घरकुलांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे महापौर कळमकर यांनी सांिगतले. नगरपालिका आताच्या महापालिकेत सफाई कामगार म्हणून २५ वर्ष सेवा करणाऱ्या ११३ कर्मचाऱ्यांनाही या प्रकल्पात हक्काची घरे मिळणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना एक रुपयादेखील खर्च करावा लागणार नाही. डॉ. आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत त्यांना ही घरे मिळणार आहेत. मनपाचे बहुतेक सफाई कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात, त्यापैकी काहींना आता हक्काची घरे मिळणार आहेत. त्यामुळे हे कर्मचारी अिधकच सुखावले आहेत.
०३ घरकूल प्रकल्प
७०० कुटुंबांना लाभ
२० कोटींचा खर्च
६९३ एकूण घरकुले
घरकुलांच्या कामांची पाहणीप्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापौर अिभषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर महापािलकेचे अिधकारी.

शीला शिंदे यांचा पुढाकार
माजीमहापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात घरकूल योजनेचे काम सुरू झाले. शिंदे यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिले. दिवसातून एकदा कामाची पाहणी करणे, कामातील अडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी आढावा बैठका घेणे, निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, यासाठी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेले घरकुलांचे काम आता पूर्णत्वाकडे आहे. लवकरच त्याचे लोकार्पण होईल.

प्रगतीचा घेतला आढावा
तीनघरकुल प्रकल्पांचे मोठे काम पूर्णत्वाकडे आहे, अनेक कुटुंबांना स्वत:ची घरे मिळणार आहेत, याचे समाधान आहे. कामाच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतला. येत्या काही दिवसांतच घरकुलांचे लोकार्पण होणार आहे. िकरकोळ कामे बाकी आहेत, ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी देखील घरकुलांच्या कामाची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले.

मोठे काम लागले मार्गी
घरकुलप्रकल्पांसाठी केंद्र राज्य शासनाकडून २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला, त्यात महापालिका लाभार्थींची दहा टक्के रक्कम आहे. प्रत्येक कुटुंबाला २६९ स्क्वेअर फुटाचे सर्व सोयी-सुविधा असलेले प्रशस्त घर मिळणार आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर १२ वर्षात प्रथमच एक मोठे काम मार्गी लागणार आहे. लाभार्थी कुटुंब लवकरच या घरकुलांमध्ये राहायला जाणार आहेत.

शहरापासून जवळ
घरकुलांच्यातिन्ही प्रकल्पांमध्ये लाभर्थींना केवळ घरेच मिळणार नाहीत, तर अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाइन, संरक्षक भिंत, स्ट्रीट लाइट, उद्यान अशा अनेक सुविधाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पांच्या परिसरात लाभार्थींसाठी समाज मंदिरदेखील उभारण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकल्प म्हणजे शहरातील एखाद्या मोठ्या खासगी गृहप्रकल्पांप्रमाणेच आहेत. शिवाय मध्यवर्ती शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावरच आहेत.