आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र आईच्या जाचामुळे वांबोरीत मुलीची आत्महत्या, राहुरी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी- तालुक्यातील वांबोरी येथे अल्पवयीन मुलीने आपल्या सावत्र आईला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर सावत्र आईने तिला मारहाण केली. या तणावातून मुलीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या आईसह तीन जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तीनही आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
गुरुवारी (६ एप्रिल) शाळेतून लवकर घरी आल्यानंतर अल्पवयीन मुलीने सावत्र आईला एका व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्याचवळी तेथे आणखी एक महिलाही उपस्थित होती. सावत्र आईने या मुलीला झाडुने लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे मुलीने स्वत:ला रॉकेल ओतून पेटवून घेतले. काही नागरिकांनी तिला तत्काळ नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे औषध उपचार सुरू असताना तिला मृत घोषित करण्यात आले. 
 
याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यामध्ये सावत्र आई ज्योती उर्फ सुरेखा अनिल दळवी, रामभाऊ नाना पंडित, अकील मेहबूब शेख या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू हे करीत आहेत. यावेळी सहायक फौजदार पी. एम. तोडकरी, हेडकॉन्स्टेबल शैलेश सरोदे, गणेश मिसाळ, पोलिस नाईक सुशांत दिवटे आदी उपस्थित होते. दरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवली होती. दरम्यान, सावत्र आईच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
 
गावात तणाव 
सावत्र आईच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच गावात संतप्त वातावरण निर्माण झाले. मुलीचा मृतदेह गावात आणला. त्यावेळी सुमारे पाचशे सातशेचा जमाव जमेला होता. या जमावाने मुलीच्या सावत्र आईसह आणखी एका महिलेला चांगलेच झोडपले. 
बातम्या आणखी आहेत...