आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिनानिमित्त घरकाम करणाऱ्या महिलांचा चांदीचे नाणे देऊन सत्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नगर - आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने आपले पाऊल उमटवलेले आहे. घरकाम करणाऱ्या महिलांकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. या महिला घरातून बाहेर पडून कामाला येतात, हीच मोठी कौतुकाची बाब आहे. या महिला जास्त अंगमेहनतीची कामे करतात. त्यांच्या कष्टाची आपण दखल घायलाच हवी, असे प्रतिपादन स्वास्थ्य हॉस्पिटलच्या संचालिका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेणुका पाठक यांनी केले.
 
महिला दिनानिमित्त सावेडीतील नंदनवन कॉलनीत किरण डहाळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या परिसरात घरकाम करणाऱ्या महिलांना डॉ. पाठक प्रभागाचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्या हस्ते चांदीचे नाणे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी थायरॉईड मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रमोद जगताप, विशेष लेखापरीक्षक अनुपमा जाधव, लक्ष्मीबाई शिंदे, कर सल्लागार अण्णासाहेब पाटील, किरण डहाळे, रामदास ससे वैशाली गुंड आदी उपस्थित होते.
 
आरोग्य आहाराविषयी बोलताना डॉ. पाठक यांनी फास्ट फूड घेता आपल्या मराठमोळी जेवणाकडे लक्ष द्यावे, असे सांगितले. आहार चौकस असला पाहिजे. आरोग्य आणि आहाराचा जवळचा संबंध आहे, असेही त्या म्हणाल्या. नगरसेवक शिंदे यांनी प्रभागातील विकासकामांची माहिती दिली. प्रभाग कचरामुक्त करण्यासाठी महिलांची कचरा टाकण्याची अडचण दूर होण्यासाठी आता पुढील आठवड्यात स्वतःच्या निधीतून कचऱ्याची गाडी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. जगताप, अनुपमा जाधव यांनाही महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेतल गुंड यांनी केले. आभार किरण डहाळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी रामदास ससे, भोसले, प्रतिभा डहाळे, वैशाली गुंड यांनी परिश्रम घेतले. 
बातम्या आणखी आहेत...