आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधरसाठी 57 टक्के मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी नगर जिल्ह्यात सुमारे ५७ % मतदान झाले. मतदान सर्वत्र शांततेत पार पडली. फेब्रुवारीला मतमोजणी हाेईल. 
नगर जिल्ह्यात ८५ हजार ५६५ मतदार आहेत. १७ उमेदवार निवडणूक रिंगणात अाहेत. सायंकाळी उशिरा हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सुमारे ५७ टक्के मतदान झाले. एकूण ४८ हजार ४४२ पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ३७ हजार ८१० पुरुष १० हजार ६३२ महिलांचा समावेश आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी टीडीएफचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे भाजपचे प्रशांत पाटील यांच्यासह १७ जणांपैकी कोणाला मतदारांचा कौल मिळतो याकडे लक्ष लागले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...