आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढू लागली विद्यार्थिनींची संख्या, मिरजगावमधील मा. फुले नूतन महाविद्यालयात मुलांच्या तुलनेत मुली जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नगर- कोपर्डी घटनेनंतर मुलींमधील आत्मविश्वास कमी झालेला नाही, हे कर्जत तालुक्यातील युवतींनी आपल्या संख्यात्मक गुणात्मक विकासाने दाखवून दिले. कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक आहे. 
 
सुरक्षितता आणि गुणवत्ता या दोन्ही कारणांमुळे शाळा महाविद्यालयांत शिकणाऱ्या मुलींची संख्या मागील तीन वर्षांत वाढली आहे. मिरजगावमधील महात्मा फुले नूतन महाविद्यालयाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ही बाब अधोरेखित झाली. 
 
राष्ट्रीय सेवा योजना, निर्भया कन्या अभियान यासारखे उपक्रम आम्ही प्रभावी पद्धतीने राबवतो. मुलींचा त्यात मुलांच्या बरोबरीचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे मुलींना सुरक्षित वाटू लागले आहे.
 
पालकांनाही आपल्या मुलींना या महाविद्यालयात पाठवताना कोणतीही चिंता वाटत नाही. त्यामुळेच मागील तीन वर्षांत एकूण विद्यार्थ्यांत मुलींचे प्रमाण ५५ टक्के झाले आहे, असे प्राचार्य डॉ. एस. एन. गंभिरे यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. 
पारितोषिके पटकावणाऱ्यांमध्येही मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. राष्ट्रीय, विद्यापीठ विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४३ जणांना सन्मानित करण्यात आले.
 
गुणानुक्रमे प्रथम, राष्ट्रीय सेवा योजनेत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांचाही गौरव केला गेला. यावेळी बोलताना प्रसिद्ध कवी लहू कानडे यांनी भीती दूर ठेवून, न्यूनगंड बाजूला सारून विकासाच्या आभाळाला गवसणी घालण्याचे आवाहन केले. नगर जिल्ह्याला लाभलेला अहिल्याबाई होळकर यांचा वारसा महाविद्यालयात शिकणाऱ्या अहिल्याबाईंच्या या लेकींनाच पुढे न्यायचा आहे, असे भूषण देशमुख यांनी सांगितले. 
 
रूरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ए. बी. चेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ. महेंद्र चेडे, सचिव प्रकाश चेडे, इ. पी. खेतमाळस, उत्तमराव बावडकर, वसंत क्षीरसागर, भगवान घोडके, पत्रकार संजय यादव, सुनील कांबळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गंभिरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भारती गुंडे प्रा. तानाजी जाधव यांनी केेले. पाहुण्यांचा परिचय प्रा. भूषण तागड यांनी करून दिला. प्रा. राजेंद्र देवकाते यांनी मानले. क्रीडा प्रतिनिधी सौरभ कांबळे, किशोर पवार प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...