आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी : अस्तगावजवळ गोळीबार; शिर्डीतील तरुण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
शिर्डी - अस्तगावजवळ बुधवारी झालेल्या गोळीबारात शिर्डीतील महेश बोऱ्हाडे हा तरुण जखमी झाला. त्याच्यावर साईबाबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गोळीबार करणारे फरार झाले असून अटकेसाठी पोलिस रवाना झालेे. 
 
महेश मच्छिंद्र जगताप बाभळेश्वर येथे लग्नास गेले होते. लग्नानंतर मोटारसायकलवरून शिर्डीकडे येत असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी सुरुवातीस मिरचीची पूड फेकली. नंतर पुढे जाऊन बाजूला गाडी उभी करत महेशवर गोळीबार केला. जखमी महेशला मोटारसायकलवर टाकून मच्छिंद्र साईबाबा रुग्णालयात नेले. हल्लेखोरांनी झाडलेली गोळी महेशच्या छातीत डाव्या बाजूने घुसून उजव्या बाजूने आरपार बाहेर पडली. फुफ्फुस बरगडी यांच्या पोकळीतून गोळी बाहेर पडल्याने मोठी इजा झाली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. सचिन दोडकर, उमेश गायकवाड लखन बोऱ्हाडे यांनी आमच्यावर हल्ला केल्याचे महेश बोऱ्हाडे मच्छिंद्र जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हे सर्वजण शिर्डीतील असून पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. 
बातम्या आणखी आहेत...