आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी, टाकळी ढोकेश्वर येथे वीज पडून एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर शहरात गुरूवारी संध्याकाळी वादळी वारे सुटले. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. - Divya Marathi
नगर शहरात गुरूवारी संध्याकाळी वादळी वारे सुटले. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते.
नगर - नगर शहरासह जिल्ह्यात गुरूवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वीज पडून एकाच मृत्यू झाला, तर श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथे वीज पडून गाय दगावली. केडगाव परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. शहरातील चौपाटी कारंजा येथे विजेचा खांब पडला, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. 
 
वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले. श्रीरामपूर, राहाता, नगर शहर तालुका, पारनेर अादी भागात वादळामुळे फळबागा कांदापिकाचे मोठे नुकसान झाले. टाकळी ढोकेश्वर येथे काही घरांचे पत्रेे उडाले. गोकूळ सुरेश वाघ (वय २३) यांचा वीज पडून मृत्यू झाला. गोकूळ क्रिकेट खेळत असतानाच त्याच्यावर वीज कोसळली. सारोळा कासार येथील फळबागांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले. 
 
नगर शहरात सुमारे १५ ते २० मिनिटे वादळ सुरू होते. चौपाटी कारंजा येथील पथदिव्यांचा खांब विजेच्या तारांवर कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुरूडगाव रस्त्यावरील जेपीएम इंग्लिश मीडियम स्कूलचे पत्रे वादळात उडून मोठे नुकसान झाले. 
 
वादळामुळे शहरातील नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. घराच्या छतावरील कपडे, प्लास्टिकचे ड्रम उडाले. घरासमोर लावलेल्या दुचाक्या जोरदार वाऱ्यामुळे पडल्या. अनेकांच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे शहराच्या विविध भागात साचलेला सर्व कचरा रस्त्यावर पसरला होता. महापालिकेकडून हा कचरा उचलला जात नसल्याने तो तसाच रस्त्याच्या कडेला, मोकळ्या भूखंडांवर पडून होता. वाऱ्यामुळे हा कचरा नागरिकांच्या घरातही गेला. त्यामुळे नागरिक महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करत होते. शहराच्या अनेक भागातील वीज सकाळपासूनच गायब झाली होती. त्यामुळे लोक वैतागले होते. 
 
केडगाव परिसरातील नागरिकांनी पहिल्याच पावसाचा आनंद लुटला. वारा जोरात सुटलेला असतानाही नागरिक पावसाचा अानंद घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, राहाता तालुक्यात वादळाने घरांचे नुकसान...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...