आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाचा मागोवा : मोहरीएवढी लहान नाणी आणि पुस्तकाएवढ्या मोठ्या नोटा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वस्तुसंग्राहक सचिन डागा यांचे नाणी, नोटा तिकिटांचे प्रदर्शन पाहताना जिल्हाधिकारी अभय महाजन. - Divya Marathi
वस्तुसंग्राहक सचिन डागा यांचे नाणी, नोटा तिकिटांचे प्रदर्शन पाहताना जिल्हाधिकारी अभय महाजन.
नगर - मोहरी एवढ्या लहान नाण्यांपासून पुस्तकाएवढ्या आकाराच्या मोठ्या नोटा, स्वातंत्र्यपूर्व काळात विविध संस्थानांमध्ये वापरलेले मुद्रांक, टपाल खात्याने प्रसिद्ध केलेली विविध प्रकारची तिकिटे आणि पाकिटे यांचा अमूल्य खजिना पाहताना सगळे हरखून गेले होते. हे प्रदर्शन भरवले होते ऐतिहासिक वस्तूंचे संग्राहक सचिन डागा यांनी. 
 
अहमदनगर ओसवाल पंचायत सभा जैन ओसवाल युवक संघ (जॉईज) आयोजित ‘स्नेह उत्सव’ अंतर्गत केशर गुलाब मंगल कार्यालयात नाणी, नोटा तिकिटांचे हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ‘स्वागत अहमदनगर’च्या हेरिटेज वॉक उपक्रमात या प्रदर्शनाला इतिहासप्रेमींनी भेट दिली. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनीही रविवारी सकाळी हे प्रदर्शन बारकाईने पहात डागा यांच्या संग्रहाचे कौतुक केले. 
 
अहमदनगरच्या निजामशाहीत येथील टांकसाळीत तयार झालेल्या तांब्याच्या नाण्यांबरोबर विविध कालखंडातील नाणी या दोन दिवस चाललेल्या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. सातवाहन, विजयनगर, मुघल, शिवकाल, हैदराबादचा निझाम, ब्रिटिश अशा वेगवेगळ्या राजवटींत वापरण्यात आलेली सोन्या-चांदीची, तसेच तांबे अन्य धातूंची दुर्मिळ नाणी इथे बघायला मिळाली. भारतातील स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील नोटा, त्यांची वैशिष्ट्ये, त्यातील मिसप्रिंट नोटा, वैशिष्ट्यपूर्ण क्रमांक असलेल्या नोटाही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. 
 
संत ज्ञानेश्वर, साईबाबा, राष्ट्रसंत आनंदऋषीजी, नगरचा भुईकोट किल्ला आदींची चित्रे असलेली तिकिटे पाकिटे टपाल खात्याने प्रकाशित केली आहेत. जयंती, पुण्यतिथी, तसेच विशिष्ट दिवसांनिमित्त काढलेली चांदीची नाणीही डागा यांच्या संग्रहात आहेत. या सर्वांची माहिती देत डागा यांनी उपस्थितांशी संवाद साधला. शेकडो नागरिकांनी या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला भेट दिली. 
 
नगरचे सोन्याचे नाणे 
निजामशाहीत सोन्याची नाणीही तयार केली जात असत. नगर, बुऱ्हाणनगरमध्ये (बुऱ्हाणाबाद) टांकसाळ होती. बुऱ्हाणशहा आणि मुर्तझा निजामशहाच्या काळातील काही नाणी सचिन डागा यांच्याकडे आहेत. त्यातील बुऱ्हाणशहाचे सोन्याचे नाणे अतिशय दुर्मीळ मानले जाते. नगरच्या नाण्यांवरील कलिग्राफी (अक्षरलेखन) अप्रतिम आहे. 
बातम्या आणखी आहेत...