आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : चोरट्या मार्गाने होतेय दमणच्या दारुची वाहतूक, उत्पादन शुल्कच्या छाप्यात प्रकार उघडकीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरारी पथकाने पकडलेली इंडिकामधून नेली जाणारी दमणची दारू. - Divya Marathi
भरारी पथकाने पकडलेली इंडिकामधून नेली जाणारी दमणची दारू.
नगर - एकीकडे जिल्ह्यात पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुविरुद्ध जोरदार मोहीम उघडली अाहे. दररोज सरासरी ३० दारुअड्ड्यांवर छापे पडत आहेत, तर दुसरीकडे परराज्यातून (दादर, नगर, हवेली, दमण) कर चुकवून आणलेल्या दारुची जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाहतूक होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरगाव येथील भरारी पथकाने बुधवारी सकाळी नेवासे तालुक्यात छापा टाकला, तेव्हा ही बाब समोर आली. 
 
सिल्व्हर रंगाच्या इंडिका कारमधून दमणमध्ये तयार झालेल्या दारुची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. निरीक्षक धनंजय लगड, भय्यासाहेब घोरतळे, दुय्यम निरीक्षक अशोक साळोखे, सूरज कुसळे, विकास कंठाळे, भाऊसाहेब भोर, अशोक भालके आदींच्या पथकाने नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार एक इंडिका कार त्यांना दिसली. 
 
उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कार अडवून झडती घेतली असता पाठीमागील सीटवर त्यांना दमणमध्ये तयार केलेली दारू सापडली. ही कारवाई घोडेगावजवळील भारभुरडी नदीच्या पुलावर करण्यात आली. पथकाने इंडिका कार (एमएच १२ एफएफ १९१०), दारू दोघांना ताब्यात घेतले. विविध नामांकित कंपन्यांचे १८० मिलिमीटर क्षमतेच्या १९२ सीलबंद बाटल्या मिळाल्या. हा सर्व मुद्देमाल एकूण लाख ४६ हजार ४६० रुपयांचा आहे. 
 
या प्रकरणी कारचालक राजेंद्र बापूराव जावळे (वय ३१, रस्तापूर रस्ता, चांदा) त्याचा साथीदार संदीप शिवाजी गायकवाड (वय ३०, चारी, चांदा, ता. नेवासे) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध कोपरगाव विभागात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक अशोक साळवे यांच्याकडे सोपवण्यात आला. जिल्ह्यात यापूर्वीही पोलिसांनी, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी दमणची अवैध दारू जप्त केली. चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक सुरूच आहे. 
 
हातभट्टी उद्ध्वस्त 
निमगावघाणा (ता. नगर) येथील हातभट्टीचा अड्डा एलसीबीच्या पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप पाटील, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, मनोहर शेजवळ, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. निमगावात गावठी दारू तयार करून ती टेम्पोतून परजिल्ह्यांत विकण्यासाठी पाठवली जात होती. 
 
नऊ लाखांचा मुद्देमाल 
निमगाव घाणा येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल हजार १०० लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. ३५ किलो नवसागर, टन गूळ टेम्पो असा एकूण लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी जागीच नष्ट केला. याप्रकरणी राजू सखाराम गव्हाणे (वय ३९, निमगाव घाणा, ता. नगर) सुदाम पांडुरंग होळकर (वय ५५, नेप्ती, ता. नगर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...