आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विपरित स्थितीच्या मुकाबल्यासाठी जवानांनी सिद्ध राहण्याची गरज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नगर- भारतीय लष्कर हे देशाचे महत्त्वाचे अंग आहे. सध्या लष्कराच्या वसाहतींवर दहशतवादी हल्ला करून त्यांना लक्ष्य करत आहेत. या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी जवानांनी सज्ज राहावे, असे आवाहन सिमला येथील आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल कमांडिंग ऑफिसर इन चिफ लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी (विशिष्ट सेवा पदक) यांनी येथे केले. 
 
नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) मध्ये तीन दिवसांचा पंचवार्षिक मेळावा सुरू आहे. त्यासाठी देशभरातून एसीसीएसचे निवृत्त अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसह येथे आले आहेत. शनिवारी एसीसीएसच्या २३० स्वारांनी (आर्मर्ड कोअर पूर्वीचे घोडदळ असल्याने तेथील जवानाला स्वार म्हणतात) शानदार दीक्षांत संचलन करत देशनिष्ठेची शपथ घेतली. त्यावेळी स्वारांना उद्देशून बोलताना सोनी यांनी हे आवाहन केले. 
 
आतापर्यंत प्रशिक्षणादरम्यान एसीसीएसमध्ये हे जवान सुरक्षित होते. यापुढे त्यांना स्वत:चे देशाचे रक्षण करायचे आहे. यापुढे ते रणगाड्यातील ‘क्रु’चे सदस्य होतील. युद्धात जिवंत राहणे, तसेच आपल्या हातातील राष्ट्रध्वज फडकत राहणे, हे जवानाच्या हाती असते. येथील जवानांना अतिशय उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळते. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत स्वत:च्या रक्षणाबरोबर देशाच्या सन्मानाचे रक्षण जवान निश्चित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
या वेळी एसीसीएसच्या २३० स्वारांनी शानदार दीक्षांत संचलन करत उपस्थितांची मने जिंकली. या संचलनाचे नेतृत्व दीपक यादव याने केले.
 
या स्वारांनी आधी आपापल्या धर्मानुसार हिंदू, मुस्लिम, शीख ख्रिस्ती धर्मगुरुंनी आणलेल्या धर्मग्रंथाला स्पर्श करून देशनिष्ठेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी वेळ पडल्यास देशासाठी प्राणत्याग करण्याची पारंपरिक शपथ घेतली. या संचलनाची पहिली सलामी एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी स्वीकारली.त्यानंतर मुख्य सलामी लेफ्टनंट जनरल सोनी यांनी स्वीकारली. त्यांनी उघड्या जीपमधून संचलनाचे निरीक्षण केले.
 
प्रशिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चंदन यादव, पीटी - गौरवकुमार, ड्रायव्हिंग - बसवराज, ड्रिल - दीपक यादव, थिअरी - प्रिन्सकुमार या स्वारांना लेफ्टनंट जनरल सोनी यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली. संचलनाआधी लेफ्टनंट जनरल सोनी यांनी निवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. 
 
अधिकाऱ्यांना विकास दाखवतो 

दरपाच वर्षांनी होणारा हा मेळावा निवृत्त अधिकाऱ्यांच्या आठवणी जाग्या करणारा असतो. त्यांनी एसीसीएस सोडतानाची परिस्थिती सध्याची परिस्थिती यांतील बदल त्यांना जाणवावा, यासाठी हा मेळावा आयोजित केला जातो. या निमित्ताने मूलभूत प्रशिक्षण, लष्करी साधनांचे प्रशिक्षण, मूलभूत सुविधा यांत झालेला विकास किंवा बदल त्यांना दाखवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले. 
 
अदम्य साहस कौशल्याचे प्रदर्शन 
दरपाच वर्षांनी होणाऱ्या या खास मेळाव्यासाठी देशभरातून एसीसीएसचे २६४ निवृत्त अधिकारी त्यांचे कुटुंबीय आले आहेत. त्यांतील एक अधिकारी ८९ वर्षांचे आहेत. या सर्व पाहुण्यांसाठी तीन दिवस विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी जवानांनी आपल्या अदम्य साहस कौशल्याचे (टॅटू डिस्प्ले) प्रदर्शन सादर केले. एसीसीएस म्हणजे आताची कवचित कोअर असली, तरी पूर्वी ती घोडदळ (कॅव्हलरी) होती. परंपरेनुसार निवृत्त अधिकारी जवान यांच्यात सायकल पोलो सामना आयोजित करण्यात आला. 
 
हिंदू, मुस्लिम, शीख ख्रिस्ती धर्मगुरुंनी आणलेल्या धर्मग्रंथाला स्पर्श करून देशनिष्ठेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी वेळ पडल्यास देशासाठी प्राणत्याग करण्याची पारंपरिक शपथ घेतली. या संचलनाची पहिली सलामी एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी स्वीकारली.त्यानंतर मुख्य सलामी लेफ्टनंट जनरल सोनी यांनी स्वीकारली. त्यांनी उघड्या जीपमधून संचलनाचे निरीक्षण केले.
 
प्रशिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चंदन यादव, पीटी - गौरवकुमार, ड्रायव्हिंग - बसवराज, ड्रिल - दीपक यादव, थिअरी - प्रिन्सकुमार या स्वारांना लेफ्टनंट जनरल सोनी यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली. संचलनाआधी लेफ्टनंट जनरल सोनी यांनी निवृत्त अधिकाऱ्यांनी युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.