आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे खटला : तीन पंचांच्या साक्षी पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाथर्डी तालुक्यातील बहुचर्चित जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात बुधवारी एका पंचाची साक्ष उलटतपासणी पूर्ण झाली. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश माळी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव काम पहात आहेत. हत्याकांडानंतर पंधरा दिवसांनी काही संशयितांची घरझडती घेण्यात आली, त्यावेळी पंचनामे करताना किशोर नामदेव भोसले हे पंच होते. 
 
सकाळच्या सत्रात अॅड. उमेशचंद्र यादव यांनी भोसले यांची सरतपासणी घेतली. आपल्यासमोर भाऊसाहेब जाधव, भीवसेन जाधव, संतोष जाधव लक्ष्मण वाघ आणि दगडू पठाण यांच्या घरांची झडती पाेलिसांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. पंचनाम्याच्या वेळा, पाचही व्यक्तींच्या घराची वर्णने, झडतीमध्ये आढळलेल्या बाबींचा तपशील त्यांनी अचूकपणे कथन केला. दुपारच्या सत्रात आरोपींच्या वतीने अॅड. सुनील मगरे यांनी उलटतपासणी घेतली. 
 
बातम्या आणखी आहेत...