आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधीश कोणत्याही धर्माचा नाही, तर केवळ भारतीय..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नूतन न्यायाधीश शशिकांत निचळ यांचा संगमनेर येथील कार्यक्रमात सत्कार करतांना माजी मंत्री बी. जे. खताळ. - Divya Marathi
नूतन न्यायाधीश शशिकांत निचळ यांचा संगमनेर येथील कार्यक्रमात सत्कार करतांना माजी मंत्री बी. जे. खताळ.
संगमनेर- न्यायाधीश जनसेवक असतो. तो कोणत्याही धर्माचा, जातीचा आणि राजकीय पक्षाचा राहत नाही, तर केवळ भारतीय असतो. सुनावणीसाठी येणारे खटले त्याने वकिलांचा म्हणजेच दोन्ही बाजुचा युक्तिवाद लक्षात घेत कायद्याचा योग्य अर्थ लावत निकाली काढायला हवे, असे प्रतिपादन माजीमंत्री बी. जे. खताळ यांनी केले. 
 
युवा वकील शशिकांत निचळ यांची नुकतीच दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली. संगमनेर मधील साळी समाजाचे ते पहिले न्यायाधीश असल्याने त्यांचा समाजातर्फे लक्ष्मीनारायण मंदिरात खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र टपळे होते. साळी समाजातील ज्येष्ठ वकील बापूसाहेब गोंगे, अॅड. दत्तात्रेय खाडे, अॅड. योगेश दातरंगे, अॅड. गिरीष मेंद्रे, आप्पासाहेब केसेकर, मुरलीधर ठाणेकर, दिलीप सांगळे, विजया भागवत आदी व्यासपीठावर होते. खताळ यांनी न्यायाधीश शशिकांत निचळ आणि त्यांच्या पत्नी श्वेता यांचा विजया भागवत यांनी सत्कार केला. 
 
खताळ म्हणाले, वकील आणि न्यायाधीश या दोन खुर्च्यांत जमीन अस्मानाचे अंतर असते. या दोन्ही खुर्च्यांची मांडणी आणि जबाबदारी वेगवेगळी असते. न्यायाधीशाने एक भारतीय जनसेवक या नात्याने लोकांना न्याय देणे अभिप्रेत आहे. ज्या प्रमाणे लोकप्रतिनिधी कायदे करतात त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे निकालदेखील एक प्रकाराचा कायदा असतो. निचळ यांना केवळ दिवाणीच नव्हे तर त्यांच्या बुध्दीमत्तेच्या जोरावर उच्च, सर्वोच्य न्यायालयातदेखील काम करण्याचे भाग्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
न्यायाधीशाने अभिमान बाळगता बुध्दी आणि कायदा यांचा समतोल साधत न्यायदानाचे काम करायला हवे. टपळे म्हणाले, समाजातील तरुणांनी निचळ यांची प्रेरणा घ्यायला हवी. त्यांच्यात प्रामाणिकपणा आेतप्रोत भरला आहे. चोखपणे ते न्यायदानाचे करतील असा विश्वास आहे. साळी समाजबांधव, युवक, आणि महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मयुर मेंद्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. 
 
निचळ यांना कष्टाची पावती मिळाली 
-निचळयांनी वकिलीस सुरुवात केल्यापासून दहा वर्षापासुन माझ्यासोबत अतिशय चांगल्या पध्दतीने काम केले. महसूल, मंत्रालय, तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय, सहकार न्यायालय, धर्मदाय आयुक्त अशा चांगल्या कामाचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. २५ हजार विद्यार्थ्यांमधुन त्यांची निवड झाली, संगमनेरच्या साळी समाजातील ते पहिले न्यायाधीश झाल्याने त्यांच्या कष्टाची आणि कामाची पावती मिळाली आहे.'' बापूसाहेब गोंगे, ज्येष्ठ वकील. 
 
बातम्या आणखी आहेत...